Lokmat Money >शेअर बाजार > Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 

Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 

Iran Israel War Effect on Indian Share Market: अमेरिेकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बाजार कोसळण्याची चिन्हे अधिक आहेत. शेअर्सपेक्षा लोकांचा कल सोन्याकडे वाढू शकतो.

By प्रसाद गो.जोशी | Updated: June 23, 2025 07:19 IST2025-06-23T07:16:38+5:302025-06-23T07:19:32+5:30

Iran Israel War Effect on Indian Share Market: अमेरिेकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बाजार कोसळण्याची चिन्हे अधिक आहेत. शेअर्सपेक्षा लोकांचा कल सोन्याकडे वाढू शकतो.

Iran Israel Conflict: A few days of crisis, will the market collapse? | Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 

Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 

- प्रसाद गो. जोशी
युद्धाचे ढग जगावर पसरले असून, आगामी सप्ताहामध्ये यावर बाजाराची चाल ठरणार आहे. याशिवाय  अमेरिकेतील उत्पादन आणि सेवा क्षेत्राची जाहीर होणारी आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांची कामगिरी ही बाजाराची स्थिती ठरविणार आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमती शेअर बाजारावर प्रभाव पाडत आहेत. या सप्ताहात डेरिव्हेटीव्हजची सौदापूर्ती असल्यामुळे बाजारावर विक्रीचे दडपण येऊ शकेल. 

अमेरिेकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बाजार कोसळण्याची चिन्हे अधिक आहेत. शेअर्सपेक्षा लोकांचा कल सोन्याकडे वाढू शकतो.

भारतामधील मान्सूनची प्रगती समाधानकारक असून, त्या पार्श्वभूमीवर बाजारात चांगली वाढ दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या सप्ताहामध्ये युद्धाच्या ज्वाळा भडकत असताना, भारतीय बाजाराने वाढ दाखविली. परकीय वित्तसंस्थांची खरेदीही चांगली असल्याचे दिसून आले. 

परकीय वित्तसंस्था करत आहेत भारतात खरेदी

मे महिन्यापासून परकीय वित्तसंस्थांनी भारतामध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी  चांगली खरेदी केली आहे. 

गतसप्ताहात या संस्थांनी ८९०६.६० कोटी रुपयांची खरेदी केली आहे. संपूर्ण महिनाभरात या संस्थांनी ३८९७.२१ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. 

खरेदीचा वेग काही प्रमाणात मंदावलेला दिसून येत आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनी चालू महिन्यामध्ये ५६,७८६.३० कोटी रुपयांची खरेदी केली आहे.

Web Title: Iran Israel Conflict: A few days of crisis, will the market collapse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.