Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणूकदारांकडे गोल्डन चान्स, 'या' ५ स्टॉक्सवर HSBC बुलिश; कोणते आहेत शेअर्स, काय आहे टार्गेट प्राईज?

गुंतवणूकदारांकडे गोल्डन चान्स, 'या' ५ स्टॉक्सवर HSBC बुलिश; कोणते आहेत शेअर्स, काय आहे टार्गेट प्राईज?

ट्रम्प यांच्या शुल्काच्या स्थगितीनंतर मात्र शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. दरम्यान, एचएसबीसी सिक्युरीटीजनं ५ शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. पाहूया कोणते आहेत ते शेअर्स.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:13 IST2025-04-15T14:11:46+5:302025-04-15T14:13:21+5:30

ट्रम्प यांच्या शुल्काच्या स्थगितीनंतर मात्र शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. दरम्यान, एचएसबीसी सिक्युरीटीजनं ५ शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. पाहूया कोणते आहेत ते शेअर्स.

Investors have a golden chance HSBC is bullish on these 5 stocks which are the shares what is the target price reliance adani shriram icici tvs motors | गुंतवणूकदारांकडे गोल्डन चान्स, 'या' ५ स्टॉक्सवर HSBC बुलिश; कोणते आहेत शेअर्स, काय आहे टार्गेट प्राईज?

गुंतवणूकदारांकडे गोल्डन चान्स, 'या' ५ स्टॉक्सवर HSBC बुलिश; कोणते आहेत शेअर्स, काय आहे टार्गेट प्राईज?

ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. परंतु शुल्काच्या स्थगितीनंतर मात्र शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. दरम्यान, एचएसबीसी सिक्युरीटीजनं ५ शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. पाहूया कोणते आहेत हे स्टॉक्स.

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)

एचएसबीसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी या वर्षी अनेक मोठ्या संधी आहेत, ज्या कंपनीला पुढे नेऊ शकतात. त्यांच्या रिटेल व्यवसायातही सुधारणा दिसून येऊ शकते. शिवाय न्यू एनर्जी सेगमेंट तेजी वाढेल आणि कंपनी डिजिटल क्षेत्रातही मोठी वाढ दाखवू शकते. एचएसबीसीचं म्हणणं आहे की, रिलायन्सच्या शेअरची किंमत खूप चांगल्या मूल्यावर आहे, म्हणजेच जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर ही योग्य संधी असू शकते. त्यांनी यासाठी १५९० रुपयांचं टार्गेट निश्चित केलंय.

टीव्हीएस मोटर्स (TVS Motor)

एचएसबीसी सिक्युरिटीजचं म्हणणे आहे की सप्टेंबर २०२४ पासून हा शेअर सुमारे २०% घसरला आहे. म्हणजेच स्टॉक पूर्वीपेक्षा स्वस्त झाला आहे, परंतु आता गावांमध्ये मागणी पुन्हा वाढत असल्यानं परिस्थिती बदलू शकते. कंपनी आपल्या उत्पादनांचं नवीन लॉन्च देखील करत आहे, ज्यामुळे विक्री आणि मार्केट होल्डिंगमजबूत होऊ शकते. या सर्व कारणांमुळे कंपनी आपला मार्केट शेअर कायम ठेवेल आणि आगामी काळात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास एचएसबीसीने व्यक्त केलाय. त्यांनी या शेअरसाठी २८०० रुपयांचं टार्गेट ठेवलंय.

श्रीराम फायनान्स (Shriram Finance)

एचएसबीसीचा असा विश्वास आहे की श्रीराम फायनान्सची स्थिती अतिशय मजबूत आहे, विशेषत: त्याच्या कर्जाच्या गुणवत्तेच्या बाबतीत, म्हणजेच कंपनीनं ज्या लोकांना किंवा व्यवसायांना कर्ज दिलं आहे त्यांच्याकडून पैसे परत मिळण्याची शक्यता, याव्यतिरिक्त एचएसबीसीला विश्वास आहे की कंपनीचा एयूएम (म्हणजे एकूण कर्ज आणि गुंतवणूक) येत्या काळात १५% ते १९% वेगानं वाढू शकेल. दरम्यान, एचएसबीसीनं या कंपनीच्या शेअरसाठी ८१० रुपयांचं टार्गेट प्राईज ठेवलंय.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

एचएसबीसीचं म्हणणं आहे की आयसीआयसीआय बँक गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे आणि त्यामागे अनेक भक्कम कारणं आहेत. बँकेची मालमत्तेची गुणवत्ता खूप चांगली आहे, म्हणजेच ज्या लोकांना बँकेनं कर्ज दिले आहे, ते पैसे परत करण्याची शक्यता जास्त आहे. कमाई सतत वाढत आहे आणि नफाही खूप चांगला आहे. एचएसबीसीचा असा विश्वास आहे की आयसीआयसीआय बँकेची वाढ इतर बँकांच्या तुलनेत वेगवान आणि मजबूत आहे. त्यांनी या शेअरसाठी १६१० रुपयांचं टार्गेट प्राईझ निश्चित केलंय.

अदानी पोर्ट्स (Adani Ports)

एचएसबीसीचा असा विश्वास आहे की अदानी पोर्ट्स ही भारताच्या व्यापार आणि पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी दीर्घकालीन विश्वासार्ह कंपनी आहे, याचा अर्थ असा आहे की जर भारताचा व्यापार आणि पायाभूत सुविधा वाढल्या तर अदानी पोर्ट्सला देखील ते फायदेशीर ठरेल. हे जास्त करून आयातीवर अधिक अवलंबून आहेत, ज्यामुळे व्यापारयुद्धासारख्या जागतिक समस्यांचा त्यावर कमी परिणाम होतो. एचएसबीसीनं या शेअरसाठी १,६०० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हा स्थिर गुंतवणुकीचा पर्याय असल्याचं म्हटलंय.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Investors have a golden chance HSBC is bullish on these 5 stocks which are the shares what is the target price reliance adani shriram icici tvs motors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.