lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, तुफान तेजीनं पळतोय स्टॉक

अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, तुफान तेजीनं पळतोय स्टॉक

शेअर बाजारात भलेही चढ-उतार होत असेल, पण असे काही शेअर्स आहेत जे अत्यंत वेगानं धावत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 09:11 AM2024-02-24T09:11:02+5:302024-02-24T09:11:17+5:30

शेअर बाजारात भलेही चढ-उतार होत असेल, पण असे काही शेअर्स आहेत जे अत्यंत वेगानं धावत आहेत.

Investors bullish buy the shares of Adani wilmar share stock increased 9 percent in day huge profit | अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, तुफान तेजीनं पळतोय स्टॉक

अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, तुफान तेजीनं पळतोय स्टॉक

शेअर बाजारात भलेही चढ-उतार होत असेल, पण असे काही शेअर्स आहेत जे अत्यंत वेगानं धावत आहेत. या शेअर्सच्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळत आहे. असाच एक शेअर दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीचाही आहे. या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. शुक्रवारी हा शेअर 8 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला. हा शेअर अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मर लिमिटेडचा ​​आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये बंपर उसळी पाहायला मिळाली.
 

शुक्रवारी कामकाजाच्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये बंपर उसळी पाहायला मिळाली. शेअर 8.80 टक्क्यांनी वाढून 392 रुपयांवर पोहोचला. शेअर 27 अंकांपेक्षा जास्त वाढीसह शेअर 388 रुपयांवर बंद झाला. स्टॉक त्याच्या एका वर्षातील उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची चांगली खरेदी दिसून येत आहे. येत्या काळात या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना आहे.
 

गुंतवणूकदार मालामाल
 

अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त नफा झाला आहे. गेल्या 5 दिवसांत स्टॉक 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर दुसरीकडे गेल्या एका महिन्यात शेअर्सच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. अदानी विल्मर शेअरची एक वर्षाची उच्चांती पातळी 509 रुपये आहे. सध्या हा शेअर तेजीनं उच्चांकी स्तराच्या जवळ पोहोचतोय. नजीकच्या काळात शेअर 450 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता गुंतवणूकदारांना आहे.
 

तिमाहीची स्थिती काय?
 

जर आपण कंपनीच्या निकालांवर नजर टाकली तर, चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत, अदानी विल्मरचा निव्वळ नफा वर्ष दर वर्ष 18.29 टक्क्यांनी घसरला आहे. या तिमाहीत कंपनीला 201 कोटी रुपयांचा नफा झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 246 कोटी रुपये होता. त्याच वेळी, ऑपरेशन्समधील महसूल 16.91 टक्क्यांनी घसरून 12 हजार 828 कोटी रुपयांवर आलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Investors bullish buy the shares of Adani wilmar share stock increased 9 percent in day huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.