Lokmat Money >शेअर बाजार > पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये

पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये

Akash missile makers BEL : पाकिस्तानविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या आकाश तीर क्षेपणास्त्राच्या निर्मितीत बीईएलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता कंपनीचे तिमाही निकालही समोर आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:21 IST2025-05-20T14:17:10+5:302025-05-20T14:21:36+5:30

Akash missile makers BEL : पाकिस्तानविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या आकाश तीर क्षेपणास्त्राच्या निर्मितीत बीईएलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता कंपनीचे तिमाही निकालही समोर आले आहेत.

India's Akash missile makers foil Pakistan plans; stocks rally up to 10% | पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये

पाकला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्माती कंपनी मालामाल; २ तासात कमावले ४६०० कोटी रुपये

Akash missile makers BEL : पाकिस्तानमधील दहशतवादाविरुद्ध भारतीय लष्कराने केलेले 'ऑपरेशन सिंदूर' सर्वांना आठवत असेल. या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि भारत सरकारची महत्त्वाची कंपनी असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ची सध्या जोरदार कमाई सुरू आहे. विशेष म्हणजे, कंपनीने केवळ २ तासांत तब्बल ४,६०० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे!

BEL च्या शेअर्समध्ये वाढ
आज शेअर बाजारात जरी घसरण दिसत असली, तरी बीईएलच्या शेअर्समध्ये सुमारे २ टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी कंपनीचे शेअर्स ३६९.०५ रुपयांवर उघडले आणि काही तासांतच १.७१ टक्क्यांनी वाढून ३६९.८० रुपयांवर पोहोचले. सध्या (दुपारी १ वाजेपर्यंत) हा शेअर ०.६० टक्क्यांच्या वाढीसह ३६५.९५ रुपयांवर व्यवहार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या ७ ट्रेडिंग दिवसांमध्ये (८ मे नंतर) कंपनीच्या स्टॉकमध्ये २०.५३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

कंपनीला मोठा नफा
शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे बीईएलच्या मार्केट कॅपमध्ये (बाजार भांडवल) मोठी वाढ झाली आहे. जेव्हा शेअर उच्चांकावर पोहोचला, तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप २,७०,३१५.६२ कोटी रुपये होते. तर, आदल्या दिवशी (सोमवारी) ते २,६५,७४७.०१ कोटी रुपये होते. याचा अर्थ कंपनीने केवळ दोन तासांत ४,५६८.६१ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे! जर ८ मे पासूनचा विचार केला, तर कंपनीने ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला आहे.

उत्कृष्ट तिमाही निकाल
भारत इलेक्ट्रॉनिक्सचे चौथ्या तिमाहीचे निकाल खूपच चांगले आले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १८.४ टक्क्यांनी वाढून २,१२७ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जानेवारी-मार्च काळात हा नफा १,७९७ कोटी रुपये होता. त्याचबरोबर, कंपनीचा एकूण महसूल ६.८ टक्क्यांनी वाढून ९,१४९.६ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत ८,५६४ कोटी रुपये होता. कंपनीचे एकूण उत्पन्नही वाढले आहे आणि खर्च थोडासा वाढला आहे.

वाचा - सोन्याचा भाव गडगडला! चांदीही झाली स्वस्त, खरेदीदारांसाठी मोठी संधी!

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बीईएलची आर्थिक कामगिरी सध्या खूपच चांगली आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनाही फायदा होत आहे.

Web Title: India's Akash missile makers foil Pakistan plans; stocks rally up to 10%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.