Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!

बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!

Share Market : भारतीय शेअर बाजार आज सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह लाल रंगात बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:33 IST2025-06-19T16:33:57+5:302025-06-19T16:33:57+5:30

Share Market : भारतीय शेअर बाजार आज सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह लाल रंगात बंद झाला.

Indian Stock Market Downturn Midcap & Smallcap Hit Hard Amid Global Tensions Auto Sector Shines | बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!

बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!

Share Market : सध्या जगात अनिश्चितेचं वातावरण निर्माण आलं आहे. एकीकडे इस्रायल-इराणमधील वाढता युद्धसंघर्ष तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्ध. अशात अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. या सर्वांचा परिपाक म्हणजे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (आज) पुन्हा एकदा दबावाचे वातावरण दिसून आले. निफ्टीच्या साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी बाजार एका विशिष्ट मर्यादेतच व्यवहार करत होता. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज स्थिर स्थितीत पण घसरणीसह बंद झाले.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपला मोठा फटका
आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. हा सलग तिसरा दिवस आहे, जेव्हा व्यापक बाजारात बेंचमार्क निर्देशांकापेक्षा अधिक कमकुवतपणा होता. बाजारात नफा बुकिंग, शेअर्सचे उच्च मूल्यांकन आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदारांनी स्मॉल आणि मिड-कॅप शेअर्सपासून स्वतःला दूर ठेवले, ज्यामुळे त्यांच्याशी संबंधित निर्देशांक कोसळले.

क्षेत्रीय आघाडीवर पाहता, बँकिंग, रिअल्टी, धातू (मेटल) आणि आयटी (IT) शेअर्समध्ये विक्रीचा दबाव स्पष्टपणे दिसला. मात्र, या नकारात्मक वातावरणातही ऑटो इंडेक्स (वाहन उद्योग) वाढीसह बंद झाला, हे विशेष.

आज बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?
गुरुवारी पूर्ण दिवसाच्या कामकाजानंतर, शेअर बाजार खालील स्तरांवर बंद झाला.

  • निफ्टी १९ अंकांनी घसरून २४,७९३ वर बंद झाला.
  • सेन्सेक्स ८३ अंकांनी घसरून ८१,३६२ वर बंद झाला.
  • निफ्टी बँक २५१ अंकांनी घसरून ५५,५७७ वर बंद झाला.
  • निफ्टी मिडकॅप निर्देशांक ९४९ अंकांनी घसरून ५७,१६० वर बंद झाला, जो व्यापक बाजारातील घसरण दर्शवतो.

आज कोणत्या शेअर्समध्ये तेजी-घसरण दिसून आली?
आजच्या सत्रात काही शेअर्समध्ये चांगली कामगिरी झाली, तर काहींना घसरणीचा सामना करावा लागला.
तेजीत असलेले शेअर्स
ऑटो इंडेक्स हा एकमेव असा क्षेत्र होता जिथे वाढ दिसून आली. आयशर मोटर्स आणि एम अँड एम (M&M) हे ऑटो क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शेअर्सपैकी एक होते. आयटी शेअर्समध्ये विप्रो हा एकमेव तेजीचा शेअर होता, जो २% वाढीसह बंद झाला. सकारात्मक ब्रोकरेज नोटनंतर स्विगी (२% ने वधारला. तसेच, बायोकॉन बुधवारी झालेले नुकसान भरून काढण्यात यशस्वी झाला आणि २% ने वधारला.

घसरलेले शेअर्स
अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये सलग सातव्या सत्रात घसरण झाली आणि तो आज ३% ने खाली आला. ब्रोकरेज रिपोर्टनंतर टेक महिंद्राच्या शेअरमध्ये २% ची घसरण दिसून आली. आयकेएच हेल्थ ब्लॉक डीलनंतर ५% ने घसरून बंद झाला. इंटेलेक्ट डिझाइन, सायंट, झीन एंटरप्रायझेस, वरुण बेव्हरेजेस आणि आयआरईडीए हे मिडकॅपमधील सर्वात जास्त घसरलेल्या समभागांच्या यादीत होते.

वाचा - अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?

जागतिक आणि स्थानिक कारणांमुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता कायम असून, गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत असल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Indian Stock Market Downturn Midcap & Smallcap Hit Hard Amid Global Tensions Auto Sector Shines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.