India-America Trade Deal: अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरम भूमिका घेतल्यानंतर भारतीयशेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये 4,200 पेक्षा अधिक अंकांची वाढ नोंदवली गेली. याचा थेट फायदा देशातील आघाडीच्या कंपन्यांना झाला असून, टॉप-10 कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात 5.40 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
रिलायन्स आणि एचडीएफसी बँक आघाडीवर
रिलायन्स इंडस्ट्रीज: शेअरमध्ये 7% पेक्षा अधिक वाढ
मार्केट कॅप ₹1,33,768.49 कोटींनी वाढून ₹20,14,985.17 कोटी
एचडीएफसी बँक: सुमारे 7% तेजी
मार्केट कॅप ₹96,488.38 कोटींनी वाढून ₹15,23,500.64 कोटी
आयटी क्षेत्रातही दमदार कामगिरी
इन्फोसिस: सुमारे 6% वाढ
मार्केट कॅप ₹41,068.96 कोटींनी वाढून ₹7,17,865.49 कोटी
टीसीएस: 5.28% वाढ
मार्केट कॅप ₹60,563.02 कोटींनी वाढून ₹12,07,172.33 कोटी
बँकिंग आणि वित्त क्षेत्र चमकले
आयसीआयसीआय बँक: 4.72% वाढ
मार्केट कॅप ₹45,637.64 कोटींनी वाढून ₹10,12,898.08 कोटी
एसबीआय: सुमारे 6% तेजी
मार्केट कॅप ₹56,803.76 कोटींनी वाढून ₹10,05,948.20 कोटी
बजाज फायनान्स: 7.76% वाढ
मार्केट कॅप ₹43,681.84 कोटींनी वाढून ₹6,06,412.23 कोटी
इतर प्रमुख कंपन्यांची कामगिरी
हिंदुस्तान युनिलिव्हर: सुमारे 2% वाढ
मार्केट कॅप ₹10,291.21 कोटींनी वाढून ₹5,63,807.91 कोटी
एलआयसी: 4.87% वाढ
मार्केट कॅप ₹24,762.37 कोटींनी वाढून ₹5,33,134.05 कोटी
एलअँडटी (L&T): सुमारे 5% वाढ
मार्केट कॅप ₹27,229.62 कोटींनी वाढून ₹5,66,732.44 कोटी
गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
जागतिक पातळीवर व्यापार तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. टॅरिफ सवलतींच्या अपेक्षेमुळे आयटी, बँकिंग, ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये व्यापक खरेदी झाली.
(टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)
