Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > देशातील टॉप ५ कंपन्यांच्या यादीतून टाटांची सर्वात मौल्यवान कंपनी बाहेर; नेमकं काय घडलं?

देशातील टॉप ५ कंपन्यांच्या यादीतून टाटांची सर्वात मौल्यवान कंपनी बाहेर; नेमकं काय घडलं?

Tata Group TCS : टाटा ग्रुपची प्रमुख कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल झपाट्याने घसरले आहे. १२ फेब्रुवारी रोजी आयसीआयसीआय बँकेने टीसीएसला मागे टाकत भारतातील पाचवी सर्वात मोठी कंपनी बनली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:22 IST2026-02-12T14:54:21+5:302026-02-12T15:22:58+5:30

Tata Group TCS : टाटा ग्रुपची प्रमुख कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल झपाट्याने घसरले आहे. १२ फेब्रुवारी रोजी आयसीआयसीआय बँकेने टीसीएसला मागे टाकत भारतातील पाचवी सर्वात मोठी कंपनी बनली.

ICICI Bank Overtakes TCS to Become India's 5th Most Valuable Company | देशातील टॉप ५ कंपन्यांच्या यादीतून टाटांची सर्वात मौल्यवान कंपनी बाहेर; नेमकं काय घडलं?

देशातील टॉप ५ कंपन्यांच्या यादीतून टाटांची सर्वात मौल्यवान कंपनी बाहेर; नेमकं काय घडलं?

Tata Group TCS : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस साठी 'ब्लॅक थर्सडे' ठरला. आयटी शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड विक्रीमुळे टीसीएसच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली आहे. परिणामी, खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने टीसीएसला मागे टाकत भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, कालच स्टेट बँक ऑफ इंडियाने टीसीएसला मागे टाकले होते.

बाजार भांडवलाचे नवीन समीकरण
टीसीएसच्या शेअरमध्ये आज ५ टक्क्यांची घसरण झाल्याने कंपनीचे बाजार भांडवल १०.०४ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये २ टक्क्यांची वाढ झाल्याने त्यांचे भांडवल १०.२२ लाख कोटींवर पोहोचले.

भारतातील टॉप ५ मौल्यवान कंपन्या

रँक कंपनीचे नाव मार्केट कॅप (अंदाजे) 
रिलायन्स इंडस्ट्रीज १९.८ लाख कोटी
एचडीएफसी बँक १४.२ लाख कोटी
भारती एअरटेल११.७५ लाख कोटी
स्टेट बँक ऑफ इंडिया११.०८ लाख कोटी
आयसीआयसीआय बँक१०.२२ लाख कोटी

आयटी शेअर्समध्ये का झाली पडझड?
आयटी क्षेत्रातील या घसरणीमागे प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अमेरिकेतील आर्थिक घडामोडी कारणीभूत आहेत. एआयमुळे सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपन्यांच्या व्यवसायावर आणि कमाईवर परिणाम होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. अमेरिकेतील नोकऱ्यांचा अहवाल अपेक्षेपेक्षा चांगला आला असला, तरी वॉल स्ट्रीटवर भारतीय आयटी कंपन्यांच्या एडीआरमध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. २०२५ मध्ये निफ्टी आयटी इंडेक्स १३ टक्क्यांनी घसरला होता, तर २०२६ मध्ये आतापर्यंत हा इंडेक्स ११ टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

वाचा - टाटा ट्रस्ट्समध्ये पुन्हा अंतर्गत संघर्ष? मेहली मिस्त्रींच्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण; कॉर्पोरेट विश्वात खळबळ

बँकिंग क्षेत्राचे वर्चस्व वाढले
गेल्या दोन दिवसांतील घडामोडी पाहता, भारतीय बाजारपेठेत बँकिंग क्षेत्राचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. टीसीएससारख्या आयटी दिग्गज कंपनीला आधी सरकारी बँक आणि आता खासगी बँकेने मागे टाकणे, हे बाजारातील बदलत्या प्रवाहाचे संकेत मानले जात आहेत.
 

Web Title : टाटा की सबसे मूल्यवान कंपनी शीर्ष 5 से बाहर; क्या हुआ?

Web Summary : आईटी क्षेत्र में गिरावट के कारण टीसीएस का बाजार मूल्य गिरा। आईसीआईसीआई बैंक ने टीसीएस को पछाड़कर भारत की पांचवीं सबसे मूल्यवान कंपनी बन गई। बैंकिंग क्षेत्र का प्रभुत्व बढ़ा।

Web Title : Tata's most valuable company out of top 5; what happened?

Web Summary : TCS market value plummeted due to IT sector sell-off. ICICI Bank surpassed TCS, becoming India's fifth most valuable company. Banking sector dominance increases.