Lokmat Money >शेअर बाजार > HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल

HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल

HDB Financial IPO Listing Today: एचडीएफसी बँकेची सब्सिडायरी असलेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 10:52 IST2025-07-02T10:51:05+5:302025-07-02T10:52:14+5:30

HDB Financial IPO Listing Today: एचडीएफसी बँकेची सब्सिडायरी असलेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला.

HDB Financial IPO Listing HDFC nbfc makes bumper entry in stock market investors huge profit | HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल

HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल

HDB Financial IPO Listing Today: एचडीएफसी बँकेची सब्सिडायरी असलेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सचं जबरदस्त लिस्टिंग झालं. बीएसईवर हा शेअर ८३५ रुपयांवर लिस्ट झाला, जो ७४० रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा १३ टक्के प्रीमियम आहे. एनएसईवर हा शेअर १२ टक्के प्रीमियमसह ८२४ रुपयांवर लिस्ट झाला. या इश्यूला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

१६.६९ पट सबस्क्रिप्शन

एचडीएफसी बँकेची सब्सिडायरी असलेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ बोलीच्या शेवटच्या दिवसापर्यंत १६.६९ पट सब्सक्राइब झाला होता. एनएसईवर उपलब्ध माहितीनुसार, आयपीओसाठी १३,०४,४२,८५५ शेअर्सच्या तुलनेत २,१७,६७,६२,१४० शेअर्ससाठी बोली मिळाली होती. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सची (क्यूआयबी) श्रेण ५५.४७ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सची श्रेणी ९.९९ पट सब्सक्राइब झाली होती. किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत (RII) १.४१ पट सब्सस्क्रिप्शन मिळालं. बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसनं अँकर गुंतवणूकदारांकडून ३,३६९ कोटी रुपये गोळा केले.

९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी

२४ जूनला इश्यू खुला

कंपनीचा आयपीओ २४ जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला. गुंतवणूकदारांना २७ जूनपर्यंत या इश्यूमध्ये पैसे गुंतवता येणार होते. आयपीओमध्ये ७०० ते ७४० रुपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आली होती. या आयपीओमध्ये २,५०० कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स आणि प्रवर्तक एचडीएफसी बँकेकडून १०,००० कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेलचा (ओएफएस) समावेश होता. सध्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये एचडीएफसी बँकेचा ९४.३६ टक्के हिस्सा आहे.

कंपनी योजना

नव्या इश्यूमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर कंपनी आपला भांडवली आधार मजबूत करण्यासाठी करणार आहे. यामुळे व्यवसायवाढीला चालना देण्यासाठी अतिरिक्त कर्जासह भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यास मदत होईल. एचडीबी फायनान्शिअलचा आयपीओ हा दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईच्या २७,००० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर गेल्या तीन वर्षांतील दुसरा सर्वात मोठा आयपीओ आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: HDB Financial IPO Listing HDFC nbfc makes bumper entry in stock market investors huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.