Groww IPO Allotment and GMP: नोव्हेंबर महिना आयपीओसाठी (IPO) वाईट ठरत आहे. अनेक मोठ्या आयपीओने गुंतवणूकदारांना निराश केलंय. आज ऑनलाइन गुंतवणूक प्लॅटफॉर्म ग्रो (Groww) च्या मूळ कंपनी बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स (Billionbrains Garage Ventures) च्या आयपीओचे वाटप (Alotment) होणार आहे. परंतु, ग्रे मार्केटमध्ये याचीही स्थिती चांगली नाही. याचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) आतापर्यंतच्या उच्चाकी स्तरावरून ८२ टक्क्यांनी खाली घसरलाय.
यापूर्वी सोमवारी लेन्सकार्टचा (Lenskart) आयपीओ शेअर बाजारात ३ टक्के डिस्काउंटसह लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी त्याचा जीएमपी ९० टक्के घसरला होता. त्यामुळे ग्रोच्या आयपीओ लिस्टिंगबाबतही गुंतवणूकदारांच्या मनात चिंता निर्माण होऊ लागल्या आहेत. याची लिस्टिंग उद्या, म्हणजेच १२ नोव्हेंबरला होईल.
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
अलॉटमेंट स्थिती अशी तपासा
ज्या गुंतवणूकदारांना शेअर मिळाले आहेत, त्यांच्या डिमॅट खात्यात (Demat Account) आज शेअर जमा होतील. उद्या, म्हणजेच बुधवारी, हा स्टॉक शेअर बाजारात लिस्ट होईल, म्हणजे ट्रेडिंगसाठी उपलब्ध होईल. जर तुम्हीही या आयपीओसाठी बोली लावली असेल, तर अलॉटमेंटची स्थिती खालीलप्रमाणे तपासू शकता:
१. ग्रो ॲपद्वारे (Groww App):
- सर्वात आधी Groww ॲप उघडा आणि नंतर IPO सेक्शनमध्ये जा.
- त्यानंतर तुम्हाला ज्या आयपीओसाठी अर्ज केला होता, तो दिसेल. तो निवडा. ग्रोच्या आयपीओसाठी Billionbrains Garage Ventures निवडा.
- आता तुम्हाला अलॉटमेंटची स्थिती दिसेल. जर अलॉटमेंट झाले नसेल, तर बुकिंगची रक्कम तुमच्या खात्यात परत जमा होईल.
२. रजिस्ट्रार MUFg Intime India द्वारे:
- MUFg Intime India च्या या in.mpms.mufg.com/Initial_Offer/public-issues.html वेबसाइटवर जा. होमपेजवर IPO Allotment Status सेक्शन उघडा.
- ड्रॉपडाउन लिस्टमधून Billionbrains Garage Ventures (Groww) निवडा.
- त्यानंतर तुमचा PAN नंबर, अर्ज क्रमांक (Application No) किंवा डिमॅट अकाउंट/DP ID–Client ID यापैकी कोणतीही एक माहिती एन्टर करा आणि Submit वर क्लिक करा.
- स्क्रीनवर तुम्हाला शेअर मिळाले आहेत की नाही हे कळेल.
- जर कोणताही रिफंड होणार असेल, तर त्याची माहितीही मिळेल.
३. बीएसई (BSE) च्या वेबसाइटद्वारे:
- BSE च्या वेबसाइटवर bseindia.com/investors/appli_check.aspx जा.
- आता Issue Type मध्ये Equity सिलेक्ट करा.
- त्यानंतर Issue Name मध्ये Billionbrains Garage Ventures सिलेक्ट करा.
- आता Application No किंवा PAN नंबर टाका आणि सबमिट करा. तुम्हाला शेअर मिळाले आहेत की नाही हे कळेल.
ग्रे मार्केटमध्ये वाईट स्थिती
ग्रोच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये वाईट स्थिती आहे. याच्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये (GMP) मोठी घसरण झाली आहे. प्राईस बँड उघडल्यानंतर याचा जीएमपी ₹१६.७ पर्यंत पोहोचला होता. हा याचा आतापर्यंतचा उच्चांकी स्तर होता. मंगळवारी दुपारी १ वाजता याचा जीएमपी घसरून फक्त ₹३ राहिला. त्यामुळे याच्या जीएमपीमध्ये ८२ टक्के घट झाली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
