Gold Silver Rate : देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला झटका आणि मध्यपूर्वेतील इराणसोबतचा वाढता तणाव, या दोन मोठ्या कारणांमुळे सोन्याच्या भावात 'ट्रेंड रिव्हर्सल' पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसांत सोन्याने जोरदार पुनरागमन केले असून, आगामी काळात दर नव्या उच्चांकाला स्पर्श करण्याची शक्यता आहे.
२४ कॅरेटसाठी मोजावे लागतायत इतके पैसे
'गुड रिटर्न्स'च्या अहवालानुसार, आज २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:५५ पर्यंत सोन्याचे दर स्थिर राहिले असून ते खालीलप्रमाणे आहेत.
२४ कॅरेट (शुद्ध सोने) : १५,९२८ रुपये प्रति ग्रॅम (१,५९,२८० प्रति १० ग्रॅम)
२२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): १४,६०० रुपये प्रति ग्रॅम (१,४६,००० प्रति १० ग्रॅम)
१८ कॅरेट : ११,९४६ प्रति ग्रॅम (१,१९,४६० रुपये प्रति १० ग्रॅम)
प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव (प्रति ग्रॅम)
टॅक्स आणि स्थानिक मागणीमुळे विविध शहरांत दरात थोडी तफावत दिसून येत आहे.
| शहर | २४ कॅरेट (₹) | २२ कॅरेट (₹) | १८ कॅरेट (₹) |
| चेन्नई | १६,०१५ | १४,६८० | १२,५६० |
| मुंबई | १५,९२८ | १४,६०० | ११,९४६ |
| दिल्ली | १५,९४३ | १४,६१५ | ११,९६१ |
| पुणे | १५,९२८ | १४,६०० | ११,९४६ |
दुबई की भारत? कुठे आहे स्वस्त सोनं?
जर तुम्ही परदेशातून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दुबई आजही परवडणारे आहे.
दुबईतील दर: २४ कॅरेट सोने सुमारे १५,१९९ प्रति ग्रॅम आहे.
फरक : मुंबईच्या तुलनेत दुबईत सोने सुमारे ७०० रुपये प्रति ग्रॅमने स्वस्त मिळत आहे.
सोन्याचा भाव १.७० लाखांच्या पार जाणार?
मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, सोन्यासाठी 'सुवर्णकाळ' सुरू झाला आहे. 'ऑगमोंट'च्या रिसर्च हेड रेनीशा चैनानी यांच्या मते, मध्य मुदतीत सोन्याचा भाव १,६३,००० ते १,७०,००० रुपये (प्रति १० ग्रॅम) पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ५,२०० ते ५,५०० डॉलर प्रति औंसच्या दिशेने वाटचाल करत आहे.
वाचा - मुंबईतील 'त्या' एका फ्लॅटने दिला शेअर बाजारापेक्षाही जास्त परतावा! १२५ रुपयांचा भाव १.२५ लाखांवर
पुढील आठवड्याचा अंदाज (२३–२७ फेब्रुवारी)
येणारा आठवडा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अतिरिक्त १०% ते १५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. त्यातच अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढू शकते. यामुळे पुढील आठवड्यातही दर तेजीत राहण्याचे संकेत मिळत आहेत.
