Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > सोने-चांदी पुन्हा वधारले! दोन दिवसांत चांदी १६,००० रुपयांनी महागली; १० ग्रॅम सोन्याची किंमत किती?

सोने-चांदी पुन्हा वधारले! दोन दिवसांत चांदी १६,००० रुपयांनी महागली; १० ग्रॅम सोन्याची किंमत किती?

Gold-Silver : चांदीपाठोपाठ सोन्याच्या किमतीतही गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर २ एप्रिलच्या एक्सपायरीचे सोने १,५५,३८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:32 IST2026-02-20T11:37:41+5:302026-02-20T12:32:38+5:30

Gold-Silver : चांदीपाठोपाठ सोन्याच्या किमतीतही गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर २ एप्रिलच्या एक्सपायरीचे सोने १,५५,३८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.

Gold and Silver Price Update Silver Jumps ₹16,000 in Two Days, Still Below Peak Levels | सोने-चांदी पुन्हा वधारले! दोन दिवसांत चांदी १६,००० रुपयांनी महागली; १० ग्रॅम सोन्याची किंमत किती?

सोने-चांदी पुन्हा वधारले! दोन दिवसांत चांदी १६,००० रुपयांनी महागली; १० ग्रॅम सोन्याची किंमत किती?

Gold and Silver Price : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घसरणीचा सामना करणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतीत आता पुन्हा एकदा 'रॉकेट' वेगाने वाढ होताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंनी उसळी घेतली असून, आज शुक्रवारी बाजार उघडताच चांदीच्या दराने २.४४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, या वाढीनंतरही सोने आणि चांदी अद्याप त्यांच्या ऐतिहासिक उच्चांकी स्तरापेक्षा बरेच स्वस्त आहेत.

१ किलोसाठी मोजावे लागतायत २.४४ लाख!
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात आज मोठी वाढ नोंदवण्यात आली. ५ मार्चच्या एक्सपायरीची चांदी आज २,४४,८०२ रुपये प्रति किलोवर उघडली. कालच्या तुलनेत यात एकाच झटक्यात ३,४०९ रुपयांची वाढ झाली आहे. १७ फेब्रुवारीला २,२८,७८३ रुपयांवर असलेली चांदी केवळ दोन दिवसांत तब्बल १६,०१९ रुपयांनी महागली आहे.

उच्चांकी स्तरावरून १.७५ लाखांची घसरण!
चांदीत सध्या तेजी दिसत असली तरी, २९ जानेवारीच्या ऐतिहासिक उच्चांकाच्या तुलनेत ती अद्याप खूपच स्वस्त आहे. २९ जानेवारी रोजी चांदीने ४,२०,०४८ रुपयांचा उच्चांक गाठला होता. या विक्रमी स्तराच्या तुलनेत चांदी आजही तब्बल १,७५,२४६ रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

सोन्याचाही पिवळा रंग उजळला!
चांदीपाठोपाठ सोन्याच्या किमतीतही गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर २ एप्रिलच्या एक्सपायरीचे सोने १,५५,३८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. आज सोन्यात ५६७ रुपयांची वाढ झाली. १७ फेब्रुवारीला सोन्याचे दर १,५१,४१८ रुपये होते, ते आता १.५५ लाखांच्या पार गेले आहेत.

वाचा - आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री, पण पीएसयू बँकांनी सावरलं; 'हे' शेअर्स आज ठरू शकतात गेमचेंजर

सोन्यात ३७,७१० रुपयांची 'डिस्काउंट'
सोन्याचे दरही आपल्या उच्चांकी स्तरापासून बरेच खाली आहेत. २९ जानेवारी रोजी सोने १,९३,०९६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले होते. सध्या सोन्याचे दर या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा ३७,७१० रुपयांनी स्वस्त आहेत.
 

Web Title : सोना-चांदी फिर बढ़े! चांदी दो दिनों में ₹16,000 महंगी।

Web Summary : सोने और चांदी की कीमतों में फिर उछाल। चांदी दो दिनों में ₹16,000 बढ़कर ₹2.44 लाख प्रति किलो हो गई। सोना भी बढ़कर ₹1,55,386 प्रति 10 ग्राम हो गया, जो रिकॉर्ड ऊंचाई से अभी भी कम है।

Web Title : Gold and silver prices rise again! Silver up ₹16,000 in two days.

Web Summary : Gold and silver prices are surging again. Silver jumped ₹16,000 in two days, reaching ₹2.44 lakh per kg. Gold also rose, reaching ₹1,55,386 per 10 grams, still below record highs.