Lokmat Money >शेअर बाजार > पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!

पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!

Bloomberg Billionaires Index: सोमवारी शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला. त्यांची संपत्ती फक्त एका दिवसात ५.७४ अब्ज डॉलर्स (५,०३,०१,९१,८८,७००) ने वाढली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:58 IST2025-08-12T15:55:28+5:302025-08-12T15:58:06+5:30

Bloomberg Billionaires Index: सोमवारी शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला. त्यांची संपत्ती फक्त एका दिवसात ५.७४ अब्ज डॉलर्स (५,०३,०१,९१,८८,७००) ने वाढली.

Gautam Adani Gains $5.74 Billion as Indian Stock Market Recovers | पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!

पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!

Bloomberg Billionaires Index : अमेरिकन गुंतवणूक संशोधन संस्था हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमुळे उद्योगपती गौतम अदानी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर अस्थिर शेअर बाजारानेअदानी समुहातील कंपन्यांचे भांडवल अजून कमी झाले होते. मात्र, सलग ६ आठवड्यांच्या घसरणीनंतर, शेअर बाजाराला अखेर दिलासा मिळाला आहे. ८ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. या दिवशी सेन्सेक्स ७४६.२९ अंकांनी वाढून ८०,६०४.०८ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी २२१.७५ अंकांच्या वाढीसह २४,५८५.०५ अंकांवर पोहोचला. या तेजीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांना झाला.

गौतम अदानींची मोठी झेप
शेअर बाजारातील या एका दिवसाच्या तेजीमुळे गौतम अदानी  यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली.

  • एका दिवसातील कमाई: अदानी यांनी एकाच दिवसात तब्बल ५.७४ अब्ज डॉलर्स (सुमारे ५०,३०२ कोटी रुपये) कमावले.
  • एकूण संपत्ती: या वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती ७९.७ अब्ज डॉलर्स झाली आहे.
  • ब्लूमबर्ग रँकिंग: या कमाईमुळे ते पुन्हा एकदा ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील टॉप २० श्रीमंतांच्या यादीत परतले आहेत.

अंबानींची स्थिती काय?
या यादीत, मुकेश अंबानी १८ व्या स्थानावर आहेत. त्यांनीही या तेजीचा फायदा घेत एका दिवसात १.४० अब्ज डॉलर्सची कमाई केली. सध्या त्यांची एकूण संपत्ती ९९.५ अब्ज डॉलर्स आहे. कमाईच्या बाबतीत या दिवशी फक्त इलॉन मस्क हे अदानींपेक्षा पुढे होते. मस्क यांनी ६.६९ अब्ज डॉलर्सची कमाई करून जगातील टॉप २० श्रीमंतांमध्ये आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

जगातील इतर श्रीमंतांची स्थिती

  • लॅरी एलिसन: ओरेकलचे संस्थापक लॅरी एलिसन दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ३.३० अब्ज डॉलर्सने वाढून ३०५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
  • मार्क झुकरबर्ग: फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर असले तरी, या काळात त्यांना १.१५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती २६९ अब्ज डॉलर्स आहे.

वाचा - TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर

इतर भारतीय अब्जाधीश यादीत

  • अदानी आणि अंबानी यांच्या व्यतिरिक्त अनेक भारतीय अब्जाधीशांची नावे ब्लूमबर्गच्या यादीत आहेत.
  • शिव नाडर (HCL): ३५.३ अब्ज डॉलर्ससह ५६ वे स्थान.
  • शापूर मिस्त्री: ३२.३ अब्ज डॉलर्ससह ६४ वे स्थान.
  • सावित्री जिंदाल: ३१.५ अब्ज डॉलर्ससह ६५ वे स्थान.
  • याशिवाय, सुनील मित्तल, अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल, दिलीप संघवी, कुमार बिर्ला, राधाकिशन दमानी यांसारखे अनेक भारतीय उद्योगपतीही या यादीत आहेत.

Web Title: Gautam Adani Gains $5.74 Billion as Indian Stock Market Recovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.