Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > BEL ते HAL..; संरक्षण क्षेत्रातील 'या' शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ; कारण काय?

BEL ते HAL..; संरक्षण क्षेत्रातील 'या' शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ; कारण काय?

मिडल ईस्टमध्ये लष्करी हालचाली वाढल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:04 IST2026-02-20T16:02:51+5:302026-02-20T16:04:58+5:30

मिडल ईस्टमध्ये लष्करी हालचाली वाढल्या!

From BEL to HAL..; Sudden big increase in 'these' stocks in the defense sector; What is the reason? | BEL ते HAL..; संरक्षण क्षेत्रातील 'या' शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ; कारण काय?

BEL ते HAL..; संरक्षण क्षेत्रातील 'या' शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ; कारण काय?

आठवड्याच्या अखेरच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३००+अंकांनी वाढला, ज्याचा वा सकारात्मक परिणाम देशातील आघाडीच्या संरक्षण (डिफेन्स) कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून आला. BEL पासून ते HAL पर्यंत...अनेक डिफेन्स स्टॉक्समध्ये ९ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्समध्ये सुमारे २% वाढ

अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळच्या सत्रात डिफेन्स शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. यामुळे निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स सुमारे २% वाढला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर हा इंडेक्स २.११% वाढून ८,२०५ या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दरम्यान, गेल्या एका वर्षात इंडेक्समध्ये ५१% वाढ झाली असली तरी, तो अजूनही आपल्या ऑल-टाइम हाय ९,१९५ पेक्षा सुमारे ११% खालीच आहे.

डिफेन्स शेअर्समध्ये ९% पर्यंत तेजी

डिफेन्स इंडेक्समधील सर्वच शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते. त्यात Data Patterns सर्वाधिक वाढीसह ९% वाढून ₹३,१९० वर पोहोचला, तर Paras Defence & Space Technologies, MTAR Technologies मध्येही जोरदार उसळी पाहायला मिळाली. याशिवाय, Bharat Dynamics Limited सुमारे 4% वाढ, तर Hindustan Aeronautics Limited (HAL) आणि Bharat Electronics Limited (BEL) प्रत्येकी २% वधारले. BEML Limited, Mazagon Dock Shipbuilders Limited, Cochin Shipyard Limited या शेअर्समध्येही सकारात्मक व्यवहार झाला.

आज डिफेन्स स्टॉक्स का वाढले?

जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे तेलाच्या किमती वाढल्या असून, गुंतवणूकदारांनी डिफेन्स सेक्टरकडे ‘सेफ हेवन’ म्हणून पाहणे सुरू केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिडल ईस्टमध्ये लष्करी हालचाली तीव्र झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी इराणला इशारा दिला की, अणु कार्यक्रमावर तोडगा निघाला नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. यासाठी सुमारे १० दिवसांची मुदत दिल्याचे संकेत आहेत.

मिडल ईस्टमध्ये लष्करी हालचाली वाढल्या

रॉयटर्सच्या अहवालानुसार, अमेरिकेने या भागात एअरक्राफ्ट कॅरियर, युद्धनौका आणि फायटर जेट्स तैनात केले आहेत. अमेरिकन सरकारी संकेतस्थळानुसार, इराणने देशाच्या दक्षिण भागात रॉकेट प्रक्षेपणाची तयारी असल्याबाबत वैमानिकांना सूचना दिल्या आहेत.

वेंचुरा कंपनीचे रिसर्च हेड विनीत बोलिंजकर यांनी सांगितले की, प्रेडिक्शन मार्केटनुसार मार्चपर्यंत अमेरिकन हल्ल्याची ५७% शक्यता दर्शवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार डिफेन्स शेअर्सना संरक्षणात्मक गुंतवणूक पर्याय म्हणून पाहत आहेत.

डिफेन्स खर्च वाढण्याची बाजाराची अपेक्षा

INVasset PMSचे बिझनेस हेड हर्षल दसानी म्हणाले, भू-राजकीय तणाव वाढला की, देश आपल्या संरक्षण खर्चाचा पुनर्विचार करतात. त्यामुळे डिफेन्स ऑर्डर्स वाढण्याची, त्यांची अंमलबजावणी जलद होण्याची आणि शस्त्रसाठा वाढवण्याची शक्यता बाजार गृहित धरतो. त्यांच्या मते, अशा काळात डिफेन्स स्टॉक्स हे टेक्निकल ‘हेज’ ठरतात, कारण सरकारी खर्च आर्थिक चक्रांवर तुलनेने कमी अवलंबून असतो. मात्र, सध्याच्या तेजीचे मुख्य कारण भू-राजकीय तणाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही तेजी टिकून राहील की नाही, हे पुढील काळात नवीन ऑर्डर्स, प्रकल्पांची अंमलबजावणी आणि भारतातील डिफेन्स कॅपेक्स धोरण यावर अवलंबून असेल.

(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title : रक्षा शेयरों में उछाल: भू-राजनीतिक तनाव से BEL, HAL में निवेशकों की दिलचस्पी बढ़ी।

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच रक्षा शेयरों में तेजी आई। निफ्टी इंडिया डिफेंस इंडेक्स ऊपर गया। वैश्विक अनिश्चितता और रक्षा खर्च में संभावित वृद्धि के कारण निवेशक रक्षा क्षेत्र में सुरक्षित ठिकाना ढूंढ रहे हैं। बीईएल, एचएएल में महत्वपूर्ण लाभ हुआ।

Web Title : Defense Stocks Surge: Geopolitical Tensions Fuel Investor Interest in BEL, HAL.

Web Summary : Defense stocks surged amid rising US-Iran tensions. Nifty India Defence Index rose. Investors seek safe haven in defense sector due to global uncertainty and potential increase in defense spending. BEL, HAL saw significant gains.