Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर

Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर

RM Drip and Sprinklers Stock Price: एक छोटी कंपनी आपल्या भागधारकांना मोठी भेट देणार आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती रुपयांवर आहे हा शेअर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:27 IST2026-04-07T13:27:45+5:302026-04-07T13:27:45+5:30

RM Drip and Sprinklers Stock Price: एक छोटी कंपनी आपल्या भागधारकांना मोठी भेट देणार आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती रुपयांवर आहे हा शेअर.

first time RM Drip and Sprinklers giving bonus shares you will get free 5 stocks the share has increased by 2859 percent | Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर

Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर

RM Drip and Sprinklers Stock Price: एक छोटी कंपनी आपल्या भागधारकांना मोठी भेट देणार आहे. 'आर एम ड्रिप अँड स्प्रिंकलर्स' ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटणार आहे. कंपनीनं ७:५ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली. म्हणजेच, ही स्मॉलकॅप कंपनी प्रत्येक ७ शेअर्सवर ५ फ्री बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीने या बोनस शेअर्ससाठी १० एप्रिल २०२६ ही 'रेकॉर्ड डेट' निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी आपल्या भागधारकांना पहिल्यांदाच बोनस शेअर्सची भेट देतेय. मंगळवारी बीएसई (BSE) मध्ये कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह ४७.१८ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ दिवसांत या शेअरमध्ये १५ टक्क्यांची, तर एका आठवड्यात २१ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

शेअर्समध्ये २८५९% ची तुफानी वाढ

आर एम ड्रिप अँड स्प्रिंकलर्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत मोठी तेजी दिसून आली आहे. गेल्या ४ वर्षांत या कंपनीचा शेअर २८५९ टक्क्यांनी वधारलाय. ६ एप्रिल २०२२ रोजी या शेअरची किंमत १.६० रुपये होती, जी ७ एप्रिल २०२६ रोजी बीएसईमध्ये ४७.१८ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या ५ वर्षांचा विचार केल्यास शेअर्समध्ये २१७६ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या ३ वर्षांत ८०५ टक्के आणि गेल्या २ वर्षांत २३३ टक्क्यांची जोरदार वाढ झाली. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १२३.७० रुपये असून नीचांकी स्तर ३५.७० रुपये आहे.

टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?

शेअरचं १० भागांत विभाजन

आर एम ड्रिप अँड स्प्रिंकलर्सने यापूर्वी आपल्या शेअर्सचं विभाजन देखील केलंय. कंपनीनं एका शेअरचं १० भागांत विभाजन केलं होतं. सप्टेंबर २०२५ मध्ये कंपनीने १० रुपये फेस व्हॅल्यू असलेला आपला शेअर १-१ रुपये फेस व्हॅल्यूच्या १० शेअर्समध्ये विभागला. डिसेंबर २०२५ च्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा २१.०६ टक्के आहे, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा हिस्सा ७८.९४ टक्के आहे.

गेल्या ३ महिन्यांत ४७% घसरण

दीर्घकालीन मोठी तेजी असली तरी, गेल्या काही महिन्यांपासून आर एम ड्रिप अँड स्प्रिंकलर्सचा शेअर दबावाखाली आहे. गेल्या ३ महिन्यांत कंपनीचा शेअर सुमारे ४७ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच, या वर्षात आतापर्यंत शेअरमध्ये ४४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत शेअर ३५ टक्क्यांनी तर गेल्या एका महिन्यात सुमारे ९ टक्क्यांनी घसरलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : आरएम ड्रिप एंड स्प्रिंकलर्स पहली बार बोनस शेयर देगी।

Web Summary : आरएम ड्रिप एंड स्प्रिंकलर्स 7:5 बोनस शेयर देगी, रिकॉर्ड तिथि 10 अप्रैल, 2026. शेयर में चार वर्षों में 2859% की वृद्धि, लेकिन हाल ही में गिरावट आई। पहले स्टॉक विभाजन किया गया।

Web Title : RM Drip and Sprinklers to Give Bonus Shares First Time.

Web Summary : RM Drip and Sprinklers offers 7:5 bonus shares, record date April 10, 2026. Share surged 2859% in four years, but recently declined. Stock split done earlier.