Energy Mission Machineries IPO : एनर्जी मिशन मशिनरी आयपीओनं आज एनएसई एसएमईवर जबरदस्त एन्ट्री घेतली. एनर्जी मिशन मशिनरीचा शेअर १३८ रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा १६५.२२ टक्क्यांनी प्रीमिअमवर ३६६ रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. एनर्जी मिशन मशिनरीचा आयपीओ गुरुवारी, ९ मे रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि सोमवार, १३ मे रोजी बंद झाला. या इश्यूचा प्राइस बँड १३१ ते १३८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.
इतर तपशील काय?
एनर्जी मिशन मशिनरीचा आयपीओ लॉट साइज १,००० शेअर्सचा होता. एनर्जी मिशन मशिनरीचा आयपीओ तीन दिवसांत ३२०.६७ पट सब्सक्राइब झाला. एनर्जी मिशन मशिनरी आयपीओचे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि बुक रनिंग लीड मॅनेजर हेम सिक्युरिटीज लिमिटेड होते.
कंपनी सीएनसी, एनसी आणि पारंपारिक मेटल तयार करणाऱ्या मशीनचे डिझाइन आणि उत्पादन करून औद्योगिक क्षेत्रात मेटल मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनीच्या मेटल तयार करण्याच्या उपकरणांमध्ये प्रेस ब्रेक, कात्री, प्लेट रोलिंग मशीन, हायड्रोलिक प्रेस कटिंग आणि पंचिंग मशीनचा समावेश आहे.
किती होती प्राईज?
एनर्जी मिशन मशिनरी आयपीओची एकूण किंमत ४१.१५ कोटी रुपये आहे. यात १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या २९,८२,००० इक्विटी शेअर्सच्या नव्या इश्यूचा समावेश होता. ३१ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कंपनीच्या करानंतरच्या नफ्यात (पीएटी) १३५ टक्के वाढ झाली आहे, तर विक्रीत २७.३१ टक्के वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)