Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद

पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद

E2E Transportation Infrastructure Listing: आयपीओमध्ये शेअरची किंमत १७४ रुपये होती. कंपनीच्या आयपीओला ५२६ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. पाहा कोणती आहे ही कंपनी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:04 IST2026-01-02T12:04:46+5:302026-01-02T12:04:46+5:30

E2E Transportation Infrastructure Listing: आयपीओमध्ये शेअरची किंमत १७४ रुपये होती. कंपनीच्या आयपीओला ५२६ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. पाहा कोणती आहे ही कंपनी.

E2E Transportation Infrastructure listing stock increased by 100 percent on the first day investors money doubled IPO received a strong response | पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद

पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद

E2E Transportation Infrastructure Listing: रेल्वे क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'ई टू ई ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर' (E2E Transportation Infrastructure) या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त सुरुवात केली आहे. शुक्रवारी एनएसईवर या कंपनीचे शेअर्स ९० टक्के नफ्यासह ३३०.६० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. आयपीओमध्ये शेअरची किंमत १७४ रुपये होती. कंपनीच्या आयपीओला ५२६ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. ई टू ई ट्रान्सपोर्टेशनचा आयपीओ २६ डिसेंबर २०२५ रोजी खुला झाला होता आणि ३० डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध होता. या आयपीओचा एकूण आकार ८४ कोटी रुपये होता.

लिस्टिंगनंतर शेअरमध्ये पुन्हा उसळी

शानदार लिस्टिंग झाल्यानंतर ई टू ई ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये आणखी वाढ झाली. कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांनी वधारून ३४७.१० रुपयांवर पोहोचलेत. १७४ रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत कंपनीचा शेअर पहिल्याच दिवशी सुमारे १०० टक्क्यांनी वधारला आहे. म्हणजेच, शेअर बाजारात एन्ट्री करताच कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. जेफायर मंत्रा LLC, वेंचरईस्ट ईटीओई LLP, सौरजीत मुखर्जी आणि विनय कुंजुरी पांडुरंगा राव हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

५२६ पटींहून अधिक सबस्क्रिप्शन

ई टू ई ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ एकूण ५२६.५६ पट सबस्क्राइब झाला होता. विविध श्रेणींमधील प्रतिसाद खालीलप्रमाणे होता.

रिटेल गुंतवणूकदार: ५४४.२८ पट सबस्क्रिप्शन.

नॉन-इन्स्टिट्यूशनल इनवेस्टर्स (NII): ८७२.०९ पट सबस्क्रिप्शन.

क्वॉलीफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB): २३६.३० पट सबस्क्रिप्शन.

या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त २ लॉटसाठी बोली लावता येत होती. दोन लॉटमध्ये १६०० शेअर्स होते, ज्यासाठी गुंतवणूकदारांना २,७८,४०० रुपये गुंतवावे लागले.

कंपनी काय काम करते?

ई टू ई ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सुरुवात २०१० मध्ये झाली असून ती एक 'ISO 9001:2015' प्रमाणित कंपनी आहे. ही कंपनी रेल्वे क्षेत्रासाठी सिस्टिम इंटिग्रेशन आणि इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रदान करते. कंपनीच्या सेवांमध्ये सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स, ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन, ट्रॅक प्रोजेक्ट्स आणि सिस्टिम इंटिग्रेशन यांचा समावेश आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीमध्ये ३५३ पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : E2E ट्रांसपोर्टेशन का शेयर डेब्यू पर दोगुना, आईपीओ में भारी उछाल।

Web Summary : E2E ट्रांसपोर्टेशन इंफ्रास्ट्रक्चर के शेयर लिस्टिंग पर 100% चढ़े, निवेशकों का पैसा दोगुना हुआ। आईपीओ को खुदरा और संस्थागत निवेशकों से भारी समर्थन मिला, 526 गुना अधिक अभिदान हुआ। कंपनी रेलवे सिस्टम इंटीग्रेशन और इंजीनियरिंग समाधान प्रदान करती है।

Web Title : E2E Transportation Share Doubles on Debut, IPO Oversubscribed.

Web Summary : E2E Transportation Infrastructure's shares soared 100% on listing, doubling investor's money. The IPO was oversubscribed 526 times, driven by strong retail and institutional interest. The company provides railway system integration and engineering solutions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.