Bonus Shares :शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यान काही कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये, एचडीएफसी बँक, करूर वैश्य बँक आणि शिल्पा मेडिकेअर यांसारख्या ८ कंपन्या पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहेत. यासाठी कंपन्यांनी रेकॉर्ड डेटची देखील घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक २ शेअर्सवर २५ शेअर्स बोनस देण्यात येणार आहे.
बोनस शेअर म्हणजे काय?
बोनस इश्यूमध्ये, कंपनी आपल्या सध्याच्या भागधारकांना अतिरिक्त मोफत शेअर्स जारी करते. हे शेअर्स सामान्यतः कंपनीच्या नफा किंवा राखीव निधीतून दिले जातात. जेव्हा शेअर्सची संख्या वाढते, तेव्हा शेअरची किंमत त्यानुसार विभाजित होते. परंतु, गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य मात्र बदलत नाही. हा निर्णय शेअर्सची तरलता वाढवण्यासाठी, शेअरची किंमत कमी करून किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दाखवण्यासाठी घेतला जातो.
या कंपन्या देणार बोनस शेअर्स
बीएसईच्या कॉर्पोरेट अॅक्शन पेजवरील माहितीनुसार, ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२५ दरम्यान अनेक कंपन्या बोनस इश्यू जारी करणार आहेत. त्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
- क्रेटो सिस्कॉन लिमिटेड: २:२५ बोनस (२ वर २५ बोनस शेअर), रेकॉर्ड डेट २५ ऑगस्ट, २०२५.
- करूर वैश्य बँक लिमिटेड: १:५ बोनस, रेकॉर्ड डेट २६ ऑगस्ट, २०२५.
- एचडीएफसी बँक लिमिटेड: १:१ बोनस, रेकॉर्ड डेट २७ ऑगस्ट, २०२५.
- डीएमआर हायड्रोइंजीनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि.: ८:५ बोनस, रेकॉर्ड डेट २८ ऑगस्ट, २०२५.
- हल्दर व्हेंचर लिमिटेड: २:१ बोनस, रेकॉर्ड डेट १ सप्टेंबर, २०२५.
- रेगिस इंडस्ट्रीज लिमिटेड: १:२ बोनस, रेकॉर्ड डेट १२ सप्टेंबर, २०२५.
- गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड: २:१ बोनस, रेकॉर्ड डेट १६ सप्टेंबर, २०२५.
- शिल्पा मेडिकेअर लिमिटेड: १:१ बोनस, रेकॉर्ड डेट ३ ऑक्टोबर, २०२५.
वाचा - दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी कंपनीच्या एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेटपूर्वी शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)