Share Market Today: जागतिक बाजारात नोंदवलेल्या घसरणीचा परिणाम आज भारतीय बाजारातही दिसून आला. देशांतर्गत शेअर बाजारानं आज मोठ्या घसरणीसह व्यापाराला सुरुवात केली. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स २८९.७४ अंकांनी (०.३५%) घसरून ८२,२११.०८ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्स देखील आज ९२.८५ अंकांच्या (०.३७%) नुकसानीसह २५,१९२.५० अंकांवर व्यापार सुरू केला. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्समध्ये १,२९३.६५ अंकांची (१.५९ टक्के) आणि एनएसई निफ्टीमध्ये ३९१.१ अंकांची (१.५७ टक्के) वाढ नोंदवली गेली होती.
केवळ ७ कंपन्यांचे शेअर्सच ग्रीन झोनमध्ये
सोमवारी सकाळी ९.१७ वाजता, सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ७ कंपन्यांचे शेअर्सच वाढीसह ग्रीन झोनमध्ये व्यापार करत होते आणि उर्वरित सर्व १६ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये होते. त्याचप्रमाणे, आज निफ्टी ५० च्या ५० पैकी केवळ ११ कंपन्यांचे शेअर्सच वाढीसह ग्रीन झोनमध्ये व्यापार करताना दिसले आणि उर्वरित सर्व ३९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये होते. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये सामील असलेल्या एशियन पेंट्सचे शेअर्स आज सर्वाधिक ०.५२ टक्के वाढीसह आणि बीईएलचे शेअर्स सर्वाधिक १.०८ टक्के घसरणीसह व्यापार करताना दिसले.
एअरटेल, आयसीआयसीआय बँकसह या शेअर्समध्ये वाढ
सेन्सेक्सच्या इतर कंपन्यांमध्ये आज सकाळी ९.१७ वाजता भारती एअरटेलचे शेअर्स ०.४८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.३० टक्के, बजाज फायनान्स ०.२७ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.२२ टक्के, मारुती सुझुकी ०.१५ टक्के आणि एटरनलचे शेअर्स ०.१३ टक्के वाढीसह व्यापार करत होते.
या शेअर्समध्ये घसरण
दुसरीकडे, इन्फोसिसचे शेअर्स १.०३ टक्के, टाटा मोटर्स १.०१ टक्के, एचसीएल टेक ०.९० टक्के, पॉवरग्रिड ०.८८ टक्के, ट्रेंट ०.७७ टक्के, आयटीसी ०.७३ टक्के, ॲक्सिस बँक ०.६८ टक्के, एलअँडटी ०.६६ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.५८ टक्के, एनटीपीसी ०.५७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.५५ टक्के, टीसीएस ०.५३ टक्के, टायटन ०.४६ टक्के, सन फार्मा ०.४२ टक्के, अडाणी पोर्ट्स ०.४० टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.४० टक्के, टेक महिंद्रा ०.३६ टक्के, एचडीएफसी बँक ०.३४ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.३३ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.३२ टक्के, टाटा स्टील ०.२९ टक्के आणि एसबीआयचे शेअर्स ०.२२ टक्के नुकसानीसह ट्रेड करत होते.