Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली

ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली

Share Market Today: अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर बंदी घालण्याची धमकी दिली. याचे पडसाद सोमवारी बाजार उघडताच उमटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 09:54 IST2026-04-13T09:54:21+5:302026-04-13T09:54:21+5:30

Share Market Today: अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर बंदी घालण्याची धमकी दिली. याचे पडसाद सोमवारी बाजार उघडताच उमटले.

big fall in stock market after Donald Trump s threat strait of hormuz Sensex falls by 1400 points Nifty below 24 thousand | ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली

ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली

Share Market Today: अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर बंदी घालण्याची धमकी दिली. याचे पडसाद सोमवारी बाजार उघडताच उमटले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १३९९.७७ अंकांनी घसरून ७६,१५०.४८ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसई (NSE) निफ्टी ५० देखील ४१०.३५ अंकांनी तुटून २३,६४०.२५ च्या पातळीवर आला.

शेअर्समध्ये मोठे चढ-उतार

बाजारातील या पडझडीत निफ्टीवर कोल इंडिया, ओएनजीसी आणि सन फार्मा या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स्, आयशर मोटर्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि श्रीराम फायनान्स या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहाराच्या सुरुवातीला अंदाजे ६१७ शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली, २२४६ शेअर्समध्ये घसरण झाली, तर १९६ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

रुपया ४९ पैशांनी घसरला

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४९ पैशांनी घसरून ९३.३२ वर पोहोचला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन चलनाच्या मजबुतीमुळे रुपयावर दबाव दिसून आला. तसंच जागतिक स्तरावरील भू-राजकीय अनिश्चिततेचाही परिणाम रुपयावर झाला आहे. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इराण-अमेरिका शांतता चर्चा निष्फळ ठरल्यामुळे 'होर्मुजची सामुद्रधुनी' खुली राहण्याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे तेलाच्या किमती वाढल्या असून, देशांतर्गत शेअर बाजारातूनगुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्यामुळे रुपयावरचा दबाव आणखी वाढला आहे.

फॉरेक्स मार्केटमध्ये रुपया ९३.३० वर उघडला आणि लगेचच तो ९३.३२ पर्यंत घसरला, जी गेल्या बंद पातळीच्या तुलनेत ४९ पैशांची घसरण आहे. याआधी शुक्रवारी रुपया ३२ पैशांच्या घसरणीसह ९२.८३ प्रति डॉलरवर बंद झाला होता.

Web Title : ट्रम्प की धमकी से शेयर बाजार में भूचाल: सेंसेक्स गिरा, निफ्टी 24 हजार से नीचे

Web Summary : ट्रम्प की धमकी के बाद होर्मुज जलडमरूमध्य पर बाजार में गिरावट आई। सेंसेक्स 1400 अंक गिरा, निफ्टी 24000 से नीचे। तेल की कीमतों में वृद्धि और भू-राजनीतिक तनावों ने रुपये को डॉलर के मुकाबले 93.32 तक कमजोर कर दिया। निवेशकों ने अनिश्चितता के बीच धन निकाला।

Web Title : Trump Threat Triggers Market Crash: Sensex Plunges, Nifty Below 24K

Web Summary : Trump's threat over the Strait of Hormuz sparked a market sell-off. Sensex plummeted 1400 points, Nifty fell below 24000. Oil price surge and geopolitical tensions weakened the rupee to 93.32 against the dollar. Investors pulled funds amid uncertainty.