Lokmat Money >शेअर बाजार > इलॉन मस्क यांना मोठा धक्का; Tesla चे शेअर कोसळले; संपत्ती 2.5 लाख कोटींनी घटली

इलॉन मस्क यांना मोठा धक्का; Tesla चे शेअर कोसळले; संपत्ती 2.5 लाख कोटींनी घटली

या वर्षात आतापर्यंत इलॉन मस्क यांच्या संपत्तीत $132 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:04 IST2025-03-11T15:04:44+5:302025-03-11T15:04:52+5:30

या वर्षात आतापर्यंत इलॉन मस्क यांच्या संपत्तीत $132 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

Big blow to Elon Musk; Tesla shares collapse; wealth decreases by Rs 2.5 lakh crore | इलॉन मस्क यांना मोठा धक्का; Tesla चे शेअर कोसळले; संपत्ती 2.5 लाख कोटींनी घटली

इलॉन मस्क यांना मोठा धक्का; Tesla चे शेअर कोसळले; संपत्ती 2.5 लाख कोटींनी घटली

Elon Musk Share Falls : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि एक्स-टेस्ला-स्पेसएक्ससारख्या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या संपत्तीत (Elon Musk Networth) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत त्यांना मोठा फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे, काही काळापासून टेस्ला शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. याणीमुळे मस्क यांची नेटवर्थ 2.5 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. दुसरीकडे, त्यांची कंपनी एक्स( ट्विटर ) देखील तांत्रिक अडचणींचा सामना करत आहे.

टेस्ला शेअर्स 15% पेक्षा जास्त घसरले
शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी यूएस स्टॉक मार्केटमध्ये  (US Stock Market) मोठी घसरण झाली आणि त्यादरम्यान इलॉन मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्सदेखील क्रॅश झाले. हा शेअर 15.43% घसरुन $222.15 वर आला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात टेस्लाच्या शेअर्सने तुफानी वाढीसह $ 488.54 प्रति शेअर हा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. तेव्हापासून टेस्लाच्या शेअरची किंमत 53% घसरली आहे.

टेस्लाच्या शेअरमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नॅस्डॅक निर्देशांकदेखील 4 टक्क्यांनी घसरला. आपण इलॉन मस्क यांच्या कंपनीच्या मार्केट कॅपवर नजर टाकली, तर तीदेखील $130 बिलियनने घसरली आहे.

24 तासांत नेट वर्थ 2.5 लाख कोटींनी घटली
टेस्लाच्या शेअर क्रॅशचा परिणाम इलॉन मस्क यांच्या नेटवर्थवरही दिसून आला. गेल्या 24 तासांत इलॉन मस्कची एकूण संपत्ती 29 अब्ज डॉलर्स (सुमारे 2.5 लाख कोटींहून अधिक) कमी झाली असून, आता 301 अब्ज डॉलर्सवर आली आहे. या वर्षात आतापर्यंत मस्कच्या संपत्तीत $132 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. विशेष बाब म्हणजे, इलॉन मस्क यांनी 2 महिन्यांत जितके पैसे गमावले, ते जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या अनेकांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहेत.

एक्स प्लॅटफॉर्म पुन्हा डाऊन
केवळ टेस्लाचा शेअर घसरत नाही, तर इलॉन मस्कची मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटर (आता एक्स) देखील अडचणींचा सामना करत आहे. सोमवारी एक्स प्लॅटफॉर्म दिवसभरात तीनदा क्रॅश झाले, ज्यामुळे जगात खळबळ उडाली. याचा सर्व्हर यापूर्वीही अनेकदा डाउन झाला आहे, मात्र एकाच दिवसात तीनदा डाऊन होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

Web Title: Big blow to Elon Musk; Tesla shares collapse; wealth decreases by Rs 2.5 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.