Lokmat Money >शेअर बाजार > Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Bajaj Finance Share Price: आज, शुक्रवार २५ जुलै रोजी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. हा स्टॉक एकदा इंट्राडे ६ टक्क्यांनी घसरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:02 IST2025-07-25T13:02:44+5:302025-07-25T13:02:44+5:30

Bajaj Finance Share Price: आज, शुक्रवार २५ जुलै रोजी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. हा स्टॉक एकदा इंट्राडे ६ टक्क्यांनी घसरला होता.

bajaj finance result share why market is down today profits increased share fell Why did the brokerage change the rating | Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Bajaj Finance Share Price: आज, शुक्रवार २५ जुलै रोजी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. हा स्टॉक एकदा इंट्राडे ६ टक्क्यांनी घसरला होता. कामकाजादरम्यान बजाज फायनान्सचे शेअर्स एनएसईवर ५.२४ टक्क्यांनी घसरून ९०८.२० रुपयांवर व्यवहार करत होते. जून तिमाहीतील निकालानं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे या एनबीएफसी स्टॉकमध्ये ही मोठी घसरण झाली. अनेक ब्रोकरेज हाऊसेसनं बजाज फायनान्सच्या शेअर्सचं रेटिंगही डाउनग्रेड केलंय. यामुळे गुंतवणूकदारांचा मूडही बदलला आणि त्यांनी वेगानं शेअर्स विकायला सुरुवात केली.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २२% वाढून ४,७६५ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ₹३,९१२ कोटी होता. जून तिमाहीत कंपनीचं एकत्रित उत्पन्न २१% वाढून ₹१९,५२४ कोटी झाले, जे आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत ₹१६,१०० कोटी होतं. आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत १.३४ कोटी नवीन कर्जे बुक करण्यात आली, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत ही संख्या १.०९ कोटी होती. म्हणजेच त्यात २३% वाढ नोंदवण्यात आली.

अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती

निव्वळ व्याज उत्पन्नातही वाढ
कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) देखील पहिल्या तिमाहीत २२% वाढून १०,२२७ कोटी रुपये झालं, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ८,३६५ कोटी रुपये होतं. त्याच वेळी, निव्वळ एकूण उत्पन्न देखील २१% नं वाढून १२,६१० कोटी रुपये झालं, जे आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत १०,४१८ कोटी रुपये होतं. एकूणच, कंपनीची कामगिरी आर्थिक ताकद दर्शवते, परंतु शेअर बाजारातील घसरण हे स्पष्ट करते की गुंतवणूकदारांच्या अपेक्षा यापेक्षा खूप जास्त होत्या.

काय म्हणाले एक्सपर्ट?
जेपी मॉर्गननं बजाज फायनान्सचं रेटिंग न्यूट्रल वरून ओव्हरवेट केलंय. या शेअरचं टार्गेट प्रति शेअर ९७० रुपये निश्चित करण्यात आलंय. ब्रोकरेजने म्हटलं की एनबीएफसी क्षेत्रातील ही त्यांची सर्वोच्च निवड आहे. २ आणि ३ चाकी वाहन कर्जामुळे कमाई कमी होण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन तिमाहींसाठी री-रेटिंगची शक्यता नाही.

यूबीएसनं गुंतवणूकदारांना बजाज फायनान्सचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजनं त्याची टार्गेट प्राईज ७५० रुपये निश्चित केली आहे. यूबीएसचं म्हणणे आहे की एमएसएमई विभागावर दबाव वाढलाय. इतर उत्पन्नामुळे नफा अपेक्षेपेक्षा जास्त दिसून आला. आर्थिक वर्ष २६ साठी क्रेडिट कॉस्ट गाईडन्स १.८५–१.९५% वर कायम आहे.

बर्नस्टाईननं या शेअरला अंडरपरर्फाम रेटिंग दिलंय आणि शेअरवर ६४० रुपयांची टार्गेट प्राईज ठेवलीये. सिटीनं स्टॉकवर न्यूट्रल कॉल दिला आहे आणि त्याची टार्गेट प्राईज ९८३ रुपये ठेवली आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: bajaj finance result share why market is down today profits increased share fell Why did the brokerage change the rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.