Lokmat Money >शेअर बाजार > ₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?

₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?

Avance Technologies Share: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं लक्ष एका पेनी स्टॉकनं वेधून घेतलं आहे. कंपनीचा हा स्टॉक ₹५ पेक्षा कमी किमतीचा आहे आणि जुलैपासून तो सतत वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:03 IST2025-09-09T16:03:04+5:302025-09-09T16:03:04+5:30

Avance Technologies Share: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं लक्ष एका पेनी स्टॉकनं वेधून घेतलं आहे. कंपनीचा हा स्टॉक ₹५ पेक्षा कमी किमतीचा आहे आणि जुलैपासून तो सतत वाढत आहे.

Avance Technologies Share Investors rush to buy shares worth rs 2 Upper circuit continuously for 43 days do you have it | ₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?

₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?

Avance Technologies Share: शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांचं लक्ष एका पेनी स्टॉकनं वेधून घेतलं आहे. अ‍ॅव्हान्स टेक्नॉलॉजीजचा हा स्टॉक ₹५ पेक्षा कमी किमतीचा आहे आणि जुलैपासून तो सतत वाढत आहे. तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या स्टॉकमध्ये १५०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. इतकंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून हा स्टॉक सतत अपर सर्किटला धडकत आहे. कंपनीच्या स्टॉकला आज मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी २% चं अपर सर्किटही लागलं आणि तो २.१७ रुपयांवर आला.

काय आहे सविस्तर माहिती

९ जुलै २०२५ पासून कंपनीच्या शेअरमध्ये सलग ४३ ट्रेडिंग सत्रांमध्ये वाढ झाली आहे. या काळात, शेअर १५२% नं वाढलाय. मासिक आधारावर, एप्रिलपासून शेअर सतत ग्रीन झोनमध्ये आहे आणि एप्रिलपासून त्यानं २६८% चा जबरदस्त परतावा दिलाय. आज (९ सप्टेंबर २०२५) शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹२.१७ ला स्पर्श केला. त्याच वेळी, १ एप्रिल २०२५ रोजी तो ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ₹०.५२ वर होता.

रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

शेअर स्प्लिटचा इतिहास

कंपनीचे शेअर्स आतापर्यंत तीन वेळा स्प्लिट झाले आहे. ते खालीलप्रमाणे -

- ३ ऑगस्ट २००९ रोजी १:१० (₹१० ते ₹१) च्या प्रमाणात

- ३१ मार्च २०२३ रोजी १:२ (₹१० ते ₹५) च्या प्रमाणात

- १० नोव्हेंबर २०२३ रोजी १:५ च्या प्रमाणात (₹५ ते ₹१)

कंपनीचा व्यवसाय

अ‍ॅव्हान्स टेक्नॉलॉजीज ही एक सॉफ्टवेअर उत्पादन कंपनी आहे. तिच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कंपनी अशी नेटवर्क सिस्टम तयार करण्यावर आणि मॅनेज करण्यावर लक्ष केंद्रित करते जे क्लायंटना कनेक्टेड राहण्यास, कामगिरी सुधारण्यास आणि डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Avance Technologies Share Investors rush to buy shares worth rs 2 Upper circuit continuously for 43 days do you have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.