Lokmat Money >शेअर बाजार > ५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!

५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!

Apollo Micro Systems Share Price : अपोलो मायक्रो सिस्टम्सने २०१८ मध्ये ३० रुपयांपेक्षा थोड्या जास्त किमतीत शेअर बाजारात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी गुंतवणूकदारांना ५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:46 IST2025-08-25T16:35:52+5:302025-08-25T16:46:31+5:30

Apollo Micro Systems Share Price : अपोलो मायक्रो सिस्टम्सने २०१८ मध्ये ३० रुपयांपेक्षा थोड्या जास्त किमतीत शेअर बाजारात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी गुंतवणूकदारांना ५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Apollo Micro Systems Stock Hits New 52-Week High on Defence Sector Rally | ५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!

५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!

Apollo Micro Systems Share Price : शेअर बाजाराने सोमवारच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी तेजीसह सुरुवात केली. यात डिफेन्स क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनी अपोलो मायक्रो सिस्टिम्सच्या शेअर्सने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीच्या शेअरने ७ टक्के वाढीसह २५२.४५ रुपयांचा नवीन ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. शुक्रवारच्या तुलनेत हा शेअर २३५.१६ रुपयांवरून थेट वर चढला आहे. गेल्या पाच दिवसांत या स्टॉकने ३० टक्क्यांची वाढ नोंदवली असून, २०२५ या वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

या शानदार तेजीवरून हे स्पष्ट होते की, देशातील डिफेन्स सेक्टर आणि स्वदेशी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे.

३० रुपयांवरून २५२ रुपयांपर्यंतचा प्रवास
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आणि खासगी कंपन्यांचा सहभाग वाढल्यामुळे संरक्षण क्षेत्राला नवीन उंची मिळत आहे. अपोलो मायक्रो सिस्टिम्सने २०१८ मध्ये ३० रुपयांहून अधिक किमतीत शेअर बाजारात प्रवेश केला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत त्याने गुंतवणूकदारांना ५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ही कंपनी सबमरीन प्रोग्रामशी संबंधित आहे. तसेच, टॉर्पेडो, अँटी-सबमरीन वॉरफेअर शस्त्रे, सोनार सिस्टिम्स आणि मॉडर्न नेव्हल इलेक्ट्रॉनिक्ससारखी महत्त्वाची प्रणाली आणि उपकरणे तयार करते.

५ वर्षांत १ लाखाचे झाले १९ लाख
गेल्या एका महिन्यात या शेअरने ४६ टक्के वाढ नोंदवली आहे. तर मागील ६ महिन्यांत ११५ टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. या वर्षातील परतावा १०८ टक्के आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांना १४० टक्के नफा झाला आहे. तर गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये १८५० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. म्हणजे ५ वर्षांपूर्वी तुम्ही या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते. तर या शेअरने गेल्या ५ वर्षांत १८५०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. म्हणजे पाच वर्षांत तुमच्या १ लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून १९ लाख ५० हजार झाले असते.

वाचा - तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
 

Web Title: Apollo Micro Systems Stock Hits New 52-Week High on Defence Sector Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.