Lokmat Money >शेअर बाजार > नागपूरमध्ये तयार होणार जेट; राफेल बनवणाऱ्या कंपनीसोबत Anil Ambani यांचा मोठा करार...

नागपूरमध्ये तयार होणार जेट; राफेल बनवणाऱ्या कंपनीसोबत Anil Ambani यांचा मोठा करार...

Anil Ambani Shares: आता भारत अमेरिका, फ्रान्स, कॅनडासारख्या देशांच्या यादीत सामील होणार.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:39 IST2025-06-18T18:39:31+5:302025-06-18T18:39:45+5:30

Anil Ambani Shares: आता भारत अमेरिका, फ्रान्स, कॅनडासारख्या देशांच्या यादीत सामील होणार.

Anil Ambani Shares: Anil Ambani's big deal with Dassault Aviation | नागपूरमध्ये तयार होणार जेट; राफेल बनवणाऱ्या कंपनीसोबत Anil Ambani यांचा मोठा करार...

नागपूरमध्ये तयार होणार जेट; राफेल बनवणाऱ्या कंपनीसोबत Anil Ambani यांचा मोठा करार...

Anil Ambani Shares: शेअर बाजारातील घसरणीदरम्यान उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या  (Reliance Aerostructures Ltd)शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून आली. आज(दि.१८) दुपारी ट्रेडिंग सत्रादरम्यान हा शेअर ५ टक्क्यांनी वाढून ३८६.०५ रुपयांवर पोहोचला. तसेच, या किमतीवर गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये ३८.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीचे एक मोठे कारण समोर आले आहे. 

राफेल बनवणाऱ्या कंपनीशी करार
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर्स लिमिटेडने भारतात फाल्कन २००० बिझनेस एक्झिक्युटिव्ह जेट बनवण्यासाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनसोबत (Dassault Aviation) करार केला आहे. ही कंपनी लढाऊ विमान राफेल बनवते. रिलायन्स इन्फ्राने बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले की, हा करार भारताची एरोस्पेस उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. दसॉल्ट एव्हिएशन प्रथमच फ्रान्सच्या बाहेर फाल्कन २००० जेट तयार करेल. या उपक्रमामुळे भारत जेट उत्पादनासाठी एक धोरणात्मक केंद्र म्हणून उदयास येईल.

अमेरिका-कॅनडा क्लबमध्ये सामील 
कंपनीने म्हटले की, हा भारतीय एरोस्पेस आणि उत्पादन उद्योगासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या ऐतिहासिक करारामुळे भारताला अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझीलसह पुढील पिढीतील व्यवसाय जेट उत्पादन करणाऱ्या देशांच्या क्लबमध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस फाल्कन सीरिजसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) बनेल. या करारानंतर भारतात फाल्कन 6X आणि फाल्कन 8X असेंबल केले जाईल. विशेष म्हणजे, ही असेंब्ली लाइन नागपूर येथे उभारली जात आहे.

रिलायन्स इन्फ्रा काय करते?
रिलायन्स इन्फ्रा दिल्लीमध्ये ईपीसी सेवा आणि वीज वितरण व्यवसाय चालवते. याशिवाय, संरक्षण क्षेत्र, मेट्रो, रस्ते आणि विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पांची अंमलबजावणी, संचालन आणि देखभाल देखील करते. 

आरइन्फ्राच्या शेअरमध्ये मोठी वाढ
रिलायन्स इन्फ्राचा शेअर आज ५ टक्क्यांनी वाढून ३८६.५० रुपयांवर बंद झाला. तर, एका महिन्यात या शेअरमध्ये ३८ टक्के आणि एका वर्षात ८३ टक्के वाढ झाली आहे. या शेअरची ५२ आठवड्यांची उच्च पातळी ४२० रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १६९.५१ रुपये प्रति शेअर आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
 

Web Title: Anil Ambani Shares: Anil Ambani's big deal with Dassault Aviation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.