Air Purifier : देशाची राजधानी दिल्ली आणि संपूर्ण उत्तर भारतात सध्या भयंकर वायुप्रदूषण आणि विषारी धूळ यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील ३ कोटींहून अधिक लोकांसाठी धुराचे हे संकट आता दरवर्षीची समस्या बनले आहे. आरोग्याच्या गंभीर समस्यांसोबतच, या परिस्थितीमुळे शेअर बाजारात मात्र गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. एअर प्युरिफायर आणि कुलिंग उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांच्या मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष त्यांच्याकडे वळले आहे.
ब्लू स्टार
ब्लू स्टार हा एक सुप्रसिद्ध भारतीय ब्रँड आहे, जो एअर प्युरिफायर, कूलर, वॉटर प्युरिफायर आणि अन्य संबंधित उत्पादने बनवतो. ब्रोकरेज फर्म 'सेंट्रम'ला अपेक्षा आहे की, FY25 ते FY28 दरम्यान ब्लू स्टारचा महसूल दरवर्षी सुमारे १६% आणि नफा सुमारे २१% दराने वाढेल. देशांतर्गत एअर कंडिशनर आणि कमर्शियल रेफ्रिजरेशन उत्पादनांना असलेल्या मजबूत मागणीमुळे ही वाढ अपेक्षित आहे. शेअरची किंमत सध्या सुमारे १,७६५ रुपयांच्या आसपास आहे. सेंट्रमने १,८०० रुपयांच्या टार्गेट प्राइससह या शेअरला 'न्यूट्रल' रेटिंग दिले आहे.
वोल्टास
टाटा समूहाची ही कंपनी 'क्लीन एअर' उत्पादनांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेऊ शकते. वोल्टास एअर कंडिशनरसाठी प्रसिद्ध असली तरी, ती एअर प्युरिफायर, एअर कूलर आणि कमर्शियल रेफ्रिजरेशन सिस्टीम देखील बनवते. ब्रोकरेज फर्म 'एलारा कॅपिटल'ने वोल्टासच्या शेअरसाठी १,३६० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे. कंपनीचे बाजारात मजबूत स्थान आहे आणि ग्राहक खर्चात सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने कंपनीच्या वाढीला प्रोत्साहन मिळू शकते, असे फर्मचे मत आहे.
हॅवेल्स इंडिया
इलेक्ट्रिकल उत्पादने बनवणारी कंपनी आणि 'लॉयड' ब्रँडची मालक असलेली हॅवेल्स इंडियाने एअर प्युरिफायर आणि घरगुती उत्पादनांच्या व्यवसायात आपली उपस्थिती वाढवली आहे. सध्याच्या किमतीनुसार, हॅवेल्सचे व्हॅल्युएशन FY26 साठी तिच्या अंदाजित उत्पन्नाच्या सुमारे ५७ पट आहे. हे कंपनीच्या मजबूत ब्रँड आणि बाजार स्थितीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवते. ब्रोकरेज फर्म 'आनंद राठी'ने या शेअरला १,७२० रुपयांच्या टार्गेट प्राइससह 'खरेदी करा'चा सल्ला दिला आहे.
हिंदवेअर होम इनोव्हेशन
बाथरूम आणि घरगुती उत्पादनांसाठी ओळखली जाणारी हिंदवेअर होम इनोव्हेशन एअर प्युरिफायर मार्केटमधील एक नवी कंपनी आहे. ब्रोकरेज फर्म 'चॉईस ब्रोकिंग'ने या कंपनीला 'खरेदी करा' चा सल्ला देत, टार्गेट प्राइस ३२५ रुपयांवरून वाढवून ३७५ रुपये केले आहे. फर्मला अपेक्षा आहे की, FY25 ते FY28 दरम्यान कंपनीचा एकूण महसूल दरवर्षी सुमारे १२% आणि EBITDA ४८% च्या दराने वाढेल. रिअल इस्टेटमधील वाढ आणि उच्च नफा असलेल्या उत्पादन श्रेणींवर कंपनीचा फोकस यामुळे ही वाढ अपेक्षित आहे.
वाचा - युरोपातील 'हा' देश बनला जगातील पहिले 'पूर्णपणे कॅशलेस' राष्ट्र; एका ॲपने आणली डिजिटल क्रांती
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
