Lokmat Money >शेअर बाजार > अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 

अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 

Air India Dreamliner crash in Ahmedabad: गुरुवार म्हणजेच १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया ड्रीमलाइनर दुर्घटनेचा परिणाम बोईंग कंपनीवरही झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:41 IST2025-06-13T11:38:06+5:302025-06-13T11:41:38+5:30

Air India Dreamliner crash in Ahmedabad: गुरुवार म्हणजेच १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया ड्रीमलाइनर दुर्घटनेचा परिणाम बोईंग कंपनीवरही झालाय.

air india plane crashed belonged to boeing affected on company stock down by 5 percent | अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 

अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 

Air India Dreamliner crash in Ahmedabad: गुरुवार म्हणजेच १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया ड्रीमलाइनर दुर्घटनेचा परिणाम बोईंग कंपनीच्या शेअर्सवरही झालाय. ७८७-८ ड्रीमलाइनर हे विमान देशी-विदेशी २४१ प्रवाशांना घेऊन जात असताना उड्डाणानंतर काही सेकंदातच मेघानीनगर भागात कोसळलं. या भीषण घसरणीनंतर गुरुवारी बोईंग कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात घसरून २०३.६० डॉलरवर बंद झाला, जो आदल्या दिवशीच्या २१४.०४ डॉलरच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी घसरून २०३.६० डॉलरवर बंद झाला.

या अपघातानंतर, गुरुवारी अमेरिकन शेअर बाजाराच्या प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये बोईंगचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरले. न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये (NYSE) सूचीबद्ध असलेल्या या जेट उत्पादक कंपनीबद्दल गुंतवणूकदारांना स्पष्टपणे चिंता होती.

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?

गुरुवारी झालेला अपघात

अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी गुरुवारी दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी विमानानं उड्डाण केलं. उड्डाणानंतर काही सेकंदातच हे विमान क्रॅश झालं. विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. १२ क्रू मेंबर्सव्यतिरिक्त २३० देशी-विदेशी प्रवासी यात होते. या दुर्घटनेत केवळ एका प्रवाशाचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे.

एका प्रवाशाचा जीव वाचला

विमान कोसळल्यानंतर त्यातील इंधनामुळे भीषण आग लागली, ज्यात सर्वांचा जळून मृत्यू झाला. मात्र, रमेश विश्वास नावाचा ब्रिटीश तरुण या भीषण अपघातातून वाचला आहे. विमान कोसळताना जेव्हा इमारतीला धडकले, त्याचवेळी रमेश विमानातून खाली पडल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या अपघातात त्यांचा भावाचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: air india plane crashed belonged to boeing affected on company stock down by 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.