Lokmat Money >शेअर बाजार > Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी

Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी

Bonus Share: कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार १:२ च्या प्रमाणात शेअर्स जारी करेल. याचा अर्थ असा की जर एखाद्या शेअरहोल्डरकडे रेकॉर्ड डेटपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल तर त्याला दोन शेअर्स मोफत दिले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:16 IST2025-07-17T15:16:10+5:302025-07-17T15:16:41+5:30

Bonus Share: कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार १:२ च्या प्रमाणात शेअर्स जारी करेल. याचा अर्थ असा की जर एखाद्या शेअरहोल्डरकडे रेकॉर्ड डेटपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल तर त्याला दोन शेअर्स मोफत दिले जातील.

After dividend patanjali foods Baba Ramdev s company will now give bonus shares 2 shares for 1 know record date | Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी

Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी

Bonus Share: पतंजली फूड्स लिमिटेडनं गुरुवार, १७ जुलै रोजी त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर त्यांच्या भागधारकांना पहिल्यांदाच बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली. कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार १:२ च्या प्रमाणात शेअर्स जारी करेल. याचा अर्थ असा की जर एखाद्या शेअरहोल्डरकडे रेकॉर्ड डेटपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल तर त्याला दोन शेअर्स मोफत दिले जातील. दरम्यान, कंपनीनं अद्याप बोनस जारी करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. योग्य वेळी रेकॉर्ड डेट जाहीर केली जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलं. बोनस शेअर्स जारी करण्याचा उद्देश विद्यमान शेअरहोल्डर्सना रिवॉर्ड देणं आणि बाजारात कंपनीच्या शेअर्सची लिक्विडीटी वाढवणं आहे.

१२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी

यापूर्वी कंपनीनं दिलाय लाभांश

कंपनी बोनस योजनेअंतर्गत अंदाजे ७२,५०,१२,६२८ नवीन इक्विटी शेअर्स जारी करेल. बोनस शेअर्सच्या वाटपानंतर, कंपनीचे एकूण भागभांडवल सध्याच्या ₹१४५.०० कोटी (३६,०६,३१,४१४ शेअर्सवर आधारित) वरून ₹२१७.५० कोटी (१०८,७५,१८,८४२ शेअर्सवर आधारित) पर्यंत वाढेल. पतंजली फूड्सनं यापूर्वी नोव्हेंबर आणि मार्च २०२४ मध्ये अनुक्रमे ₹८ आणि ₹६ प्रति शेअर अंतरिम लाभांश दिला होता, सप्टेंबर २०२३ मध्ये ₹६ आणि सप्टेंबर २०२२ मध्ये ₹५ असा अंतिम लाभांश दिला होता. आज गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली आहे आणि स्टॉक १८७६.४० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचलाय.

अधिक तपशील काय?

पतंजली फूड्स यापूर्वी ही कंपनी रुची सोया म्हणून ओळखली जात होती ती २०१९ मध्ये पतंजली आयुर्वेदानं दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे विकत घेतली. हे अधिग्रहण एकूण ₹४,३५० कोटी रुपयांना करण्यात आलं. २०२२ मध्ये, कंपनीनं रुची सोयाचा फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) देखील जारी केला ज्यातून ₹४,३०० कोटी उभारण्यात आले. या रकमेचा बराचसा भाग रुची सोयाच्या विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्यात आला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: After dividend patanjali foods Baba Ramdev s company will now give bonus shares 2 shares for 1 know record date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.