Adani Share: गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. मार्केट रेग्युलेटर सेबीने हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणातील आरोप फेटाळल्यानंतर अदानी पॉवर तब्बल 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.
ग्रुपच्या इतर कंपन्यांचे शेअर्सही रॉकेटप्रमाणे झेपावले. अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट, सांघी इंडस्ट्रीज आणि अदानी सीमेंटच्या शेअर्समध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली.
या वाढीमुळे शुक्रवारी कंपनीचे मार्केट व्हॅल्यूएशन 69 हजार कोटी रुपयांनी वाढलसे. तर, सोमवारी त्यात आणखी 1.13 लाख कोटींची भर पडली. अशारितीने फक्त दोन दिवसांत अदानी ग्रुपचे व्हॅल्यूएशन तब्बल 1.7 लाख कोटी रुपयांनी वाढले.
या शेअर्समध्ये तेजी
अदीनी पॉवर : 19.99% वाढ, ₹170.15 वर – दीड वर्षांचा उच्चांक
अदीनी टोटल गॅस : 17.49% वाढ
अदीनी ग्रीन एनर्जी : 8.12% वाढ
अदीनी एनर्जी सोल्यूशन्स : 5.67% वाढ
अदीनी एंटरप्राइजेस : 4% वाढ
एनडीटीव्ही : 3.51% वाढ
सांघी इंडस्ट्रीज : 3.29% वाढ
अदीनी पोर्ट्स : 2% वाढ
एसीसी आणि अंबुजा सिमेंट्स : प्रत्येकी 2% वाढ
विशेष म्हणजे, सोमवारी सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, तर निफ्टीत 131 अंकांची घसरण झाली. अशा वातावरणात अदानी ग्रुपच्या शेअर्सनी दमदार कामगिरी केली आहे.
सेबीची क्लीन चिट
ही उसळी सेबीच्या आदेशानंतर आली आहे. सेबीने गुरुवारी स्पष्ट केले की, हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांप्रमाणे शेअरमध्ये फेरफार किंवा संबंधित पक्षांच्या गैरवापराचा पुरावा मिळाला नाही. रॉयटर्सच्या अहवालानुसार, ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने अदानी एंटरप्राइजेसवर ₹3,000 टार्गेट प्राइससह “बाय” रेटिंग कायम ठेवली आहे. हे टार्गेट मागील क्लोजिंग प्राइसपेक्षा सुमारे 25% जास्त आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा निर्णय घ्या.)