Lokmat Money >शेअर बाजार > Adani Power Share: Adani समूहाच्या शेअर्समध्ये बाऊन्स बॅक, ११ टक्क्यांपर्यंत तेजी; सोमवारी झालेली मोठी घसरण

Adani Power Share: Adani समूहाच्या शेअर्समध्ये बाऊन्स बॅक, ११ टक्क्यांपर्यंत तेजी; सोमवारी झालेली मोठी घसरण

Adani Group Stocks: सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:10 IST2025-01-14T12:10:48+5:302025-01-14T12:10:48+5:30

Adani Group Stocks: सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

Adani Power Stock adani green energy Adani Group shares bounce back up 11 percent Big fall on Monday | Adani Power Share: Adani समूहाच्या शेअर्समध्ये बाऊन्स बॅक, ११ टक्क्यांपर्यंत तेजी; सोमवारी झालेली मोठी घसरण

Adani Power Share: Adani समूहाच्या शेअर्समध्ये बाऊन्स बॅक, ११ टक्क्यांपर्यंत तेजी; सोमवारी झालेली मोठी घसरण

Adani Group Stocks: सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अदानी पॉवरमध्ये (Adani Power) ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यानंतर कंपनीचा शेअर ५०१ रुपयांवर पोहोचला. तर दुसरीकडे अदानी ग्रीन एनर्जीमध्ये (Adani Green Energy) ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ५.४५ टक्क्यांनी वधारला आणि तो २३४६.५० रुपयांवर पोहोचला. अदानी विल्मर आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्येदेखील तेजी दिसून आली.

कामकाजादरम्यान अदानी एनर्जी सोल्युशन्सही ८.२२ टक्क्यांनी वधारला. तो ७४५ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. अदानी टोटल गॅस ५.७७ टक्क्यांनी वधारून ६६४.४५ रुपयांवर पोहोचला. एसीसी २ टक्क्यांहून अधिक वधारला. अंबुजा सिमेंटचा शेअर १.५० टक्क्यांनी वधारून ५०० च्या वर व्यवहार करत होता. एनडीटीव्हीच्या शेअरमध्येही मोठी तेजी दिसत असून त्यात ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि तो १४३ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. संघी इंडस्ट्रीजमध्येही एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

सोमवारी शेअर्स जोरदार आपटले

सोमवारी अदानी ग्रीन ५ टक्क्यांनी घसरून ८९६ रुपयांवर आला. गेल्या सहा महिन्यांत (सोमवारपर्यंत) त्यात सुमारे ४९ टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी अदानी एंटरप्रायझेस ६.२१ टक्क्यांनी घसरून २,२२७ रुपयांवर आला. सहा महिन्यांत (सोमवारपर्यंत) त्यात २८ टक्क्यांची घसरण झाली आहे.

अदानी पॉवरचा शेअर ६.२५ टक्क्यांनी घसरून ४५२.७० वर आला. सहा महिन्यांत (सोमवारपर्यंत) ३६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सोमवारच्या घसरणीत अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअरही जवळपास ५ टक्क्यांनी घसरून ६९३.०५ रुपयांवर आला. सहा महिन्यांत (सोमवारपर्यंत) त्यात ३१.६० टक्क्यांची घसरण झाली आहे. अदानी टोटल गॅस (६.६७ टक्के) आणि अदानी पोर्ट्स (३.८५ टक्के) हे शेअरही मोठ्या घसरणीसह बंद झाले.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani Power Stock adani green energy Adani Group shares bounce back up 11 percent Big fall on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.