Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांच्या तीन कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेडने 2019 ते 2024, या कालावधीत 62 ते 118 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
या तीन कंपन्यांमध्ये अदानी ग्रीनच्या शेअर्सने सर्वाधिक परतावा दिला आहे. अदानीच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये 49 पट वाढ झाली आहे. तुमच्याकडेही अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स असतील किंवा तुम्ही अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
रिटर्न देणाऱ्या टॉप 10 कंपन्यांमध्ये अदानींच्या 3 कंपन्या
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (MOFSL) टॉप 10 परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत तीन कंपन्या अदानी समूहाच्या आहेत. यामध्ये ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड पहिल्या, दुसऱ्या आणि आठव्या स्थानावर आहेत. यानंतर, जिंदाल स्टेनलेस, डिक्सन टेक्नॉलॉजीज, लिंडे इंडिया, पर्सिस्टंट सिस्टम्स आणि सीजी पॉवर तिसऱ्या ते सातव्या स्थानावर आहेत.
कोणत्या कंपनीने किती परतावा दिला?
अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 118 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे. यामध्ये अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वाधिक परतावा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 118 टक्के परतावा दिला. दुसऱ्या क्रमांकावर अदानी एंटरप्रायझेस आहे, ज्याने गेल्या 5 वर्षांत 85 टक्के परतावा दिला आहे. तिसऱ्या क्रमांकावर अदानी पॉवर आहे, ज्याने 11 ते 62 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
टॉप 10 मधील 5 कंपन्यांचे पीई रेटिंग 100 पट
MOFSL च्या मते, जर आपण सर्वाधिक परतावा देणाऱ्या 10 कंपन्यांचे P/E गुणोत्तर (किंमत कमाईचे गुणोत्तर) पाहिले, तर 5 कंपन्यांचे P/E गुणोत्तर 100 पट जास्त आहेत. MOFSL च्या मते, गेल्या चार वर्षांत अदानी समुहाच्या शेअर्सने सर्वात जलद संपत्ती मिळवणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्याची ही तिसरी वेळ आहे.
(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांची मदत घ्या.)