Lokmat Money >शेअर बाजार > वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे?

वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे?

adani group : आर्थिक वर्ष २०२५ हे अदानी समूहासाठी चांगले राहिले नाही. समूह वर्षभर कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत राहिला. याचा परिणामही त्यांना भोगावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:54 IST2025-03-24T15:54:11+5:302025-03-24T15:54:32+5:30

adani group : आर्थिक वर्ष २०२५ हे अदानी समूहासाठी चांगले राहिले नाही. समूह वर्षभर कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत राहिला. याचा परिणामही त्यांना भोगावा लागला.

adani group lost rs 3 4-lakh crore in one year who caused the biggest loss | वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे?

वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे?

adani group : ऑक्टोबर २०२४ पासून भारतीय शेअर बाजारात सुरू झालेली घसरण अखेर गेल्या आठवड्यात थांबल्याचे चित्र आहे. मात्र, या ५ महिन्यात अनेक दिग्गज कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. यात अंबानी, टाटा आणि अदानी यांच्या दिग्गज कंपन्याही सुटल्या नाहीत. अदानी समूहासाठी आर्थिक वर्ष २०२५ चढउताराचे राहिले. काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घट झाली. यामागे अनेक कारणे आहेत. त्यात अमेरिकेत झालेले भ्रष्टाचाराचे आरोपांचाही समावेश आहे. या फटका अदानी समूहाला बसला. २०२५ या आर्थिक वर्षात अदानी समूहाला ३.४ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

अहवालानुसार, अदानी ग्रीन एनर्जी शेअर्सला सर्वाधिक फटका बसला असून, त्यांनी या वर्षी त्यांच्या बाजार भांडवलापैकी निम्मे गमावले आहे. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचा क्रमांक लागतो.

या कंपनीचे सर्वाधिक नुकसान
शुक्रवार, २१ मार्चपर्यंत, अदानी ग्रीन एनर्जीचे एकूण मार्केट कॅप १.४६ लाख कोटी रुपये होते, तर २८ मार्च २०२४ रोजी, आर्थिक वर्ष २०२४ च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, कंपनीचे मार्केट कॅप २.९० लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे ५० टक्के तोटा झाला आहे. माहितीनुसार, हा स्टॉक अंदाजे २,२३६ कोटी रुपये लाचखोरीच्या कथित आरोपामुळे चर्चेत आला, ज्यामध्ये गौतम अदानी, त्याचा पुतण्या सागर अदानी आणि इतर आरोपी आहेत. या आरोपानंतर कंपनीचे शेअर्सला मोठा धक्का बसला.

शेअर बाजारात घसरण का झाली?
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये अदानी स्टॉकमधील घसरणीमागे अनेक कारणे सांगितली जातात. भारतीय इक्विटी मार्केटला ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षात स्थूल आर्थिक आव्हाने, कमकुवत शहरी उपभोग आणि भू-राजकीय जोखमींचा सामना करावा लागत आहे. धोरणात्मक अनिश्चितता आणि वाढत्या जागतिक व्याजदरांमुळे रिन्युएबल ऊर्जा आणि वायू सारख्या क्षेत्रांचे मूल्यांकन सुधारले आहे, ज्याचा भांडवली सधन व्यवसायांवर परिणाम झाला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून परकीय गुंतवणूकदारांनी सातत्याने विक्री केल्यानेही बाजार गडगडला. विशेष करुन एफपीआयने अदानी समूहातील आपली हिस्सेदारी कमी केली.

अदानी समूह वर्षभर चर्चेत
नियामक समस्यांमुळे अदानी समूहाचे शेअर्सही चर्चेत राहिले. सेबीचे माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांना अदानी कुटुंबाशी संबंधित ऑफशोर कंपन्यांशी जोडणारा हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली. अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावर "कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा" चालवल्याचा आरोप केल्यानंतर दीड वर्षानंतर, हिंडनबर्ग रिसर्चने आणखी एक मोठा दावा केला आहे. माधवी बुच यांचा अदानी समूहाशी निगडीत ऑफशोअर फंड्समध्ये हिस्सा असल्याचा आरोप करण्यात आला होता. तर दुसरीकडे अमेरिकन कोर्टातही कंपनीवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले.
 

Web Title: adani group lost rs 3 4-lakh crore in one year who caused the biggest loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.