lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > टाटा समूहाच्या या शेअरमध्ये आलीय तुफान तेजी, जमशेदपूर प्लांटसंदर्भात मोठी अपडेट!

टाटा समूहाच्या या शेअरमध्ये आलीय तुफान तेजी, जमशेदपूर प्लांटसंदर्भात मोठी अपडेट!

या शेअरची 52 आठवड्यांची निचांकी पातळी 246.15 रुपये एवढी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 04:09 PM2024-03-01T16:09:10+5:302024-03-01T16:12:36+5:30

या शेअरची 52 आठवड्यांची निचांकी पातळी 246.15 रुपये एवढी आहे.

a big update regarding the Jamshedpur plant tata group company automotive stampings share rallied 10 percent | टाटा समूहाच्या या शेअरमध्ये आलीय तुफान तेजी, जमशेदपूर प्लांटसंदर्भात मोठी अपडेट!

टाटा समूहाच्या या शेअरमध्ये आलीय तुफान तेजी, जमशेदपूर प्लांटसंदर्भात मोठी अपडेट!

टाटा समूहाची कंपनी असलेल्या ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्ज अँड असेंबलीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंगचा शेअर शुक्रवारी 10% ने वाढून 637.05 रुपयांवर पोहोचला आहे. टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका मोठ्या घोषणेमुळे झाली आहे. आपण जमशेदपूर येथील आपल्या नव्या उत्पादन प्रकल्पात व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे, अशी घोषणा ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्जने केली आहे. या शेअरची 52 आठवड्यांची निचांकी पातळी 246.15 रुपये एवढी आहे.

29 फेब्रुवारीला सुरू झाले कमर्शियल प्रोडक्शन -
ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्सने जानेवारी महिन्यात अनाउंस केले होते की, ते जमशेदपूरमध्ये नवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तयार करत आहेत. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, 'आम्हाला जाहीर करताना आनंद होत आहे की, 29 फेब्रुवारी 2024 पासून जमशेदपूर येथील नव्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये कमर्शिअल प्रोडक्शन सुरू झाले आहे.' ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्सच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीनंतर, कंपनीचे मार्केट कॅप 1010 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

4 वर्षांत शेअरमध्ये 4800% ची उसळी -
ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेम्बलीजच्या (Automotive Stampings) शेअरमध्ये गेल्या 4 वर्षांत 4800 पर्सेंटची तेजी आली आहे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्सचा शेअर 20 मार्च 2020 रोजी 13 रुपयांवर होता. तो 1 मार्च 2024 रोजी 637.05 रुपयांवर पोहोचला आहे. 

गेल्या 3 वर्षांचा विचार करता, कंपनीच्या शेअरमध्ये 1541 टक्क्यांची तेजी आली आहे. या काळात कंपनीचा शेअर 38.80 रुपयांनी वाढून 637.05 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 113 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या सहा महिन्यांत ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्सचा शेअर 55 टक्क्यांच्या जवळपास वधारला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 720 रुपये एवढा आहे.
 

Web Title: a big update regarding the Jamshedpur plant tata group company automotive stampings share rallied 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.