Multibagger Stock: मल्टीबॅगर स्टॉक इंटीग्रेटेड इंडस्ट्रीज (Integrated Industries) सलग दुसऱ्या दिवशी ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर, म्हणजेच ₹२६.६२ च्या पातळीवर पोहोचला. या स्टॉकनं सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदवली असून, ५ दिवसांत १६ टक्क्यांहून अधिक उसळी घेऊन आज ₹२६.६२ वर पोहोचला आहे. मजबूत तिमाही निकालांमुळे शेअरमध्ये ही वाढ झाली आहे.
मागील ५ वर्षांत या स्टॉकने ५३०० टक्क्यांचा जबरदस्त रिटर्न दिला आहे. परंतु, मागील १ वर्षात याच्या दरात ३५ टक्के घट झाली होती. त्याच वेळी, मागील ३ महिन्यांत तो ३६ टक्के आणि मागील १ महिन्यात ६.५ टक्के वाढला आहे.
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
तिमाही निकाल
कंपनीने सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. कंपनीचं नेट प्रॉफिट मागील वर्षीच्या याच तिमाहीतील ₹१४.७ कोटी च्या तुलनेत १०४ टक्क्यांनी वाढून ₹२९.९ कोटी झालंय. याशिवाय उत्पन्न ५४ टक्क्यांनी वाढून ₹२८६.९ कोटींवर पोहोचलं आहे. तर कंपनीचा EBITDA १०९ टक्क्यांनी वाढून ₹३०.७ कोटी झाला. तर दुसरीकडे मार्जिनमध्येही सुधारणा झाली आहे. EBITDA मार्जिन १०.७ टक्के आणि नेट प्रॉफिट मार्जिन (Net Profit Margin) १०.४ टक्के राहिलंय.
सहा महिन्यांत निव्वळ नफा झाला दुप्पट
सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या सहा महिन्यांमध्येही कंपनीची कामगिरी दमदार राहिली. नेट प्रॉफिट दुप्पट होऊन ₹५४.७ कोटी झालं. तर उत्पन्न ६४ टक्क्यांनी वाढून ₹५३६.७ कोटी राहिलं. EBITDA देखील ९२ टक्क्यांनी वाढून ₹५६.२ कोटी वर पोहोचला.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गोयल म्हणाले की, मागणीत सुधारणा, उत्तम वितरण आणि परिचालन कार्यक्षमतेमुळे ही मजबूत कामगिरी शक्य झाली आहे. कंपनीनं आपलं वितरण नेटवर्क मजबूत केलंय, निर्यात वाढवली आहे आणि आफ्रिका तसंच मध्य पूर्वेकडील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी क्षमता विस्तारावर काम केले आहे, असं ते म्हणाले. मजबूत ब्रँड आणि सुधारत असलेल्या नफाक्षमतेमुळे कंपनी ही गती कायम ठेवण्यास सक्षम असेल, असा त्यांचा विश्वास आहे.
कंपनी काय करते?
इंटीग्रेटेड इंडस्ट्रीजची स्थापना १९९५ मध्ये झाली असून, ती ऑर्गेनिक (Organic) आणि इनऑर्गेनिक (Inorganic) खाद्य उत्पादनं तसंच बेकरी प्रोडक्ट्स बनवते. याची उपकंपनी, नर्चर वेल फूड्स लिमिटेड (Nurture Well Foods Limited), रिचलाईट (RICHLITE), फनट्रीट (Funtreat) आणि क्रेजी क्रंच (Crazy Crunch) सारख्या ब्रँड्स अंतर्गत बिस्किटं आणि कुकीज बनवते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याबी प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
