Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!

फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!

SIP Return : सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक मार्ग आहे, ज्याद्वारे दीर्घकाळात मोठी रक्कम निर्माण करता येते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:16 IST2025-06-05T16:14:38+5:302025-06-05T16:16:15+5:30

SIP Return : सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक मार्ग आहे, ज्याद्वारे दीर्घकाळात मोठी रक्कम निर्माण करता येते.

SIP Success Stories How These Funds Made Investors Crorepati with Just 1,000/Month | फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!

फक्त १,००० रुपयांच्या SIP ने व्हा करोडपती! 'या' म्युच्युअल फंडांनी दिलाय १ ते २ कोटींचा परतावा!

Multibagger Mutual Funds : माझ्याकडे गुंतवणूक करण्यास जास्त पैसे नाहीत. त्यामुळे मी कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, अशी अनेकांनी ओरड असते. पण, बाजारात असे अनेक गुंतवणूक पर्याय आहेत, जिथे तुम्ही अगदी १००० रुपये गुंतवणूनही हे साध्य करू शकता. होय, तुम्ही बरोबर वाचलत. म्युच्युअल फंडात फक्त १,००० रुपयांची मासिक गुंतवणूक (SIP) करून तुम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकता! दरमहा १,००० रुपयांच्या SIP मधून खरंच १ कोटी रुपये जमा होऊ शकतात का? असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे. तर, याचं उत्तर आहे होय, हे शक्य आहे!

आम्ही जेव्हा सर्वात जुन्या आणि चांगल्या कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांचा अभ्यास केला, तेव्हा काही अशा योजना समोर आल्या, ज्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड आणि फ्रँकलिन टेम्पलटन यांच्या काही योजनांमध्ये हे शक्य झाले आहे. या सर्व योजना २९ ते ३० वर्षांपासून बाजारात आहेत.

१००० रुपयांच्या एसआयपीतून कोट्यधीश कसे झाले?
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड

  • २९ वर्षांत वार्षिक परतावा: २२.९१%
  • मासिक SIP: १,००० रुपये
  • एकूण गुंतवणूक: ३,४८,००० (२९ वर्षांत)
  • २९ वर्षांनंतर SIP चे मूल्य: २,३१,८८,६२५ (म्हणजेच २.३२ कोटी रुपये!)

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड

  • ३० वर्षांत वार्षिक परतावा: २१.२२%
  • मासिक SIP: १,००० रुपये
  • एकूण गुंतवणूक: ३,६०,००० (३० वर्षांत)
  • ३० वर्षांनंतर SIP चे मूल्य: २,०१,५५,३३९ (म्हणजेच २.०१ कोटी रुपये!)

एचडीएफसी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड

  • २९ वर्षांत वार्षिक परतावा: २२.२८%
  • मासिक SIP: १,००० रुपये
  • एकूण गुंतवणूक: ३,४८,००० (२९ वर्षांत)
  • २९ वर्षांनंतर SIP चे मूल्य: २,०४,७५,१०८ (म्हणजेच २.०४ कोटी रुपये!)

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड

  • ३० वर्षांत वार्षिक परतावा: २०%
  • मासिक SIP: १,००० रुपये
  • एकूण गुंतवणूक: ३,६०,००० (३० वर्षांत)
  • ३० वर्षांनंतर SIP चे मूल्य: १,५६,२०,४०० (म्हणजेच १.५६ कोटी रुपये!)

SIP ची 'चक्रवाढ' शक्ती!
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे कमी रकमेची बचत करून दीर्घकाळात खूप मोठी रक्कम निर्माण करता येते. यामागे 'चक्रवाढ व्याजा'ची (Compounding Interest) शक्ती काम करते. जितक्या जास्त काळ तुम्ही गुंतवणूक करता, तितका चक्रवाढीचा फायदा जास्त मिळतो आणि तुमचे पैसे अनेक पटींनी वाढू शकतात.

वाचा - जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!

टीप : कोणत्याही इक्विटी म्युच्युअल फंडातील मागील परतावा भविष्यातही तसाच राहील याची कोणतीही हमी नसते. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे, कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Web Title: SIP Success Stories How These Funds Made Investors Crorepati with Just 1,000/Month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.