Shocking! Other apps are monitoring the online activity of WhatsApp users | धक्कादायक! व्हॉट्स अ‍ॅप युझर्सच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवताहेत इतर अ‍ॅप्स

धक्कादायक! व्हॉट्स अ‍ॅप युझर्सच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवताहेत इतर अ‍ॅप्स

मुंबई - सध्याच्या सोशल मीडिया जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इतर सोशल मीडिया अ‍ॅपच्या तुलनेत वापरायला सोपे असल्याने व्हॉट्सअ‍ॅप युझर्सची संख्या मोठी आहे. पण व्हॉट्स अ‍ॅपच्या कोट्यवधी युझर्ससाठी एक धक्कादायक बातमी आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटींवर इतर अ‍ॅप्स नजर ठेवत असल्याचे उघड झाले आहे. काही अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप युझर्स कुणाशी बोलतात, कधी झोपतात, याची माहिती ठेवत असल्याचे समोर आले आहे.

एमएसएन.कॉम या संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार आपल्या प्रायव्हसी पॉलिसींबाबत व्हॉट्सअ‍ॅपला अभिमान आहे. मात्र फेसबूकच्या मालकीच्या असलेल्या या अ‍ॅपकडून सामायिक केला जाणारा डेटा बाहेरील डझनभर अ‍ॅप्सना व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटींवर नजर ठेवण्याची संधी देत असल्याचे दिसून आले आहे. या माध्यमातून युझर्स कुणाशी बोलतात. कधी झोपतात आणि कधी आपल्याकडील मोबाइलचा वापर करतात, याची माहिती या अ‍ॅप्सकडून घेतली जात आहे.व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या माहिती आणि परवानगीशिवाय त्याच्या डिजिटल सवयी जाणून घेण्यासाठी हे अ‍ॅप्स आणि सर्व्हिसेस व्हॉट्सअ‍ॅपमधील ऑनलाइन सिग्नलिंग प्रणालीचा वापर करतात. अशा अ‍ॅप्समुळे व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमाकडून युझर्सचा डेटा संरक्षित ठेवण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न होत असले तरी कशाप्रकारे युझर्सला ट्रॅक करण्यासाठी त्याचा डेटा वापरला जाऊ शकतो, हे समोर आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

Read in English

English summary :
Other apps are monitoring the online activity of WhatsApp users

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Other apps are monitoring the online activity of WhatsApp users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.