SBI loses Rs 285.66 crores, clarifies through Right to Information Act | एसबीआयकडे २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन, माहिती अधिकारातून स्पष्ट

एसबीआयकडे २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन, माहिती अधिकारातून स्पष्ट

नागपूर : देशातील आघाडीच्या स्टेट बँक आॅफ इंडियाकडे तब्बल २८५२.६६ कोटी रुपये कोणत्याही दाव्याशिवाय पडून आहेत. या रकमेवर अधिकार सांगायला कुणीही पुढे आलेले नाही. सदर रक्कम १ कोटी ८ लाख ८६ हजार ४८५ खात्यांमध्ये जमा आहे. ही आकडेवारी ३१ मार्च २०१९ पर्यंतची आहे.

अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळवली. ३१ मार्च २०१९ पर्यंत एसबीआयने प्रधानमंत्री
जनधन योजनेंतर्गत एकूण १० कोटी ९७ लाख ७८ हजार ७७५ खाती उघडली. त्यात २३ हजार १६३.३७ कोटी होते. १ कोटी २५ लाख २८ हजार ४५ शून्य जमा खाती उघडली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी बँकेने गेल्या वर्षात ६.२४ कोटी खर्च केले. पहिले १० डिफॉल्टर्स, थकित कर्ज आदी कारवाईसह अन्य माहिती बँकेने गोपनियतेच्या कारणावरून पुरवली नाही.
 

Web Title: SBI loses Rs 285.66 crores, clarifies through Right to Information Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.