World Gold Reserves: एखाद्या देशाकडे सोन्याचा साठा किती आहे, यावरुन त्या देशाच्या आर्थिक स्थैर्याची माहिती मिळते. जागतिक आर्थिक अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी सोनं अतिशय महत्वाचे साधन आहे. सोनं हा केवळ मौल्यवान धातूच नाही, तर तो आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक स्थिरतेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. 1800 आणि 1900 च्या दशकात सोनं हा जागतिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग होता.
19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात देशांनी त्यांच्या चलनांना सोन्याच्या मूल्याशी जोडले, ज्याला "गोल्ड स्टँडर्ड" म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ असा होता की, जारी केलेल्या चलनाच्या प्रत्येक युनिटचे सोन्यामध्ये निश्चित मूल्य होते आणि लोक त्यांच्या कागदी पैशाचे सोन्यामध्ये रूपांतर करू शकतात. अशा प्रकारे, देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आणि चलनाच्या बळाचा मुख्य आधार सोनं असायचे.
आधुनिक काळात सोन्याचे महत्त्व
जागतिक अर्थव्यवस्थेत सोन्याचा थेट वापर 1970 पासून संपुष्टात आला असला तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही सोन्याकडे सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. विशेषतः आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, सोन्याला फार महत्वा प्राप्त होते. जेव्हा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था संकटात येते, तेव्हा सोन्याचा साठा त्याची जागतिक विश्वासार्हता मजबूत करतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या आर्थिक व्यवहारांना समर्थन देतो.
जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले 20 देश
अमेरिका: 8,133.46 टन
जर्मनी: 3,351.53 टन
इटली: 2,451.84 टन
फ्रान्स: 2,436.97 टन
रशिया: 2,335.85 टन
चीन: 2,264.32 टन
जापान: 845.97 टन
भारत: 840.76 टन
नीदरलंड: 612.45 टन
तुर्की: 584.93 टन
पुर्तगाल: 382.66 टन
पोलंड: 377.37 टन
उझ्बेकिस्तान: 365.15 टन
यूनायटेड किंग्डम: 310.29 टन
कझाकिस्तान: 298.8 टन
स्पेन: 281.58 टन
ऑस्ट्रिया: 279.99 टन
थाइलंड: 234.52 टन
सिंगापूर: 228.86 टन
बेल्जियम: 227.4 टन
हे आकडे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या Q2 2024 च्या अहवालावर आधारित आहेत.
जगात किती सोनं उपलब्ध आहे?
आतापर्यंत जगात सुमारे 244,000 मेट्रिक टन सोन्याचा शोध लागला आहे. यापैकी 187,000 मेट्रिक टन सोन्याचे उत्पादन झाले असून, 57 हजार मेट्रिक टन सोनं अजूनही भूमिगत साठ्यात आहे. सर्वाधिक सोनं चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत सापडले आहे. 2016 मध्ये युनायटेड स्टेट्स सोन्याच्या उत्पादनात चौथ्या क्रमांकावर होता.