Investment Tips : सोन्याला नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, या वर्षात सोन्याच्या किमतीत जवळपास ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. पण, या वाढीचा खरा फायदा हा फिजिकल नाही तर डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यात आहे. अशा परिस्थितीत, कमी खर्चामध्ये सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी 'गोल्ड फंड्स' हा उत्तम पर्याय ठरत आहे.
गोल्ड फंड्स म्हणजे म्युच्युअल फंड योजना, ज्या थेट सोन्यात किंवा सोन्याशी संबंधित ॲसेटमध्ये गुंतवणूक करतात. गेल्या १० वर्षांत ज्या गोल्ड फंड्सनी उत्कृष्ट परतावा दिला आहे, त्यांची यादी शेअर बाजार जाणकारांनी जाहीर केली आहे.
गोल्ड फंड्स: कमी खर्च, मोठा परतावा
या निवडक गोल्ड फंड्सनी मागील १० वर्षांमध्ये जवळपास १५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, या फंड्सचा एक्सपेंस रेशो (गुंतवणुकीचा खर्च) केवळ ०.१०% ते ०.३२% इतका कमी आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त बचत होते.
हे टॉप ५ गोल्ड फंड्स खालीलप्रमाणे आहेत
फंड (डायरेक्ट प्लॅन) | १० वर्षांचा वार्षिक परतावा (CAGR) | एक्सपेंस रेशो | रेटिंग (Value Research) |
ॲक्सिस गोल्ड फंड | १५.२९% | ०.१७ % | ५ स्टार |
इनवेस्को इंडिया गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड | १५.३८% | ०.१० % | ३ स्टार |
एसबीआय गोल्ड फंड | १५.२१% | ०.१० % | ५ स्टार |
एचडीएफसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड | १५.२१% | ०.१८ % | ३ स्टार |
एलआयसी एमएफ गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड | १४.९३% | ०.३२ % | ४ स्टार |
- सोन्याच्या किमतीत सध्या तेजी कायम असली तरी, गोल्ड फंड्समध्ये गुंतवणूक करणे सोपे आणि सुरक्षित मानले जाते.
- गुंतवणुकीची सोय: गोल्ड फंड्स एएमसी किंवा फंड हाऊसकडून थेट खरेदी करता येतात.
- सुरक्षितता: जागतिक आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने नेहमीच सुरक्षित आश्रयस्थान म्हणून काम करते.
- दीर्घकालीन परतावा: ज्या गुंतवणूकदारांना सोन्याची सुरक्षितता आणि म्युच्युअल फंडाची सोय हवी आहे, त्यांच्यासाठी कमी खर्चात १५% पर्यंत परतावा देणारे हे फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट संधी आहेत.
- या फंड्सच्या रेटिंग आणि कमी एक्सपेंस रेशोमुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये यांचा विचार करावा, असे शेअर बाजार तज्ज्ञांचे मत आहे.
वाचा - ३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)