Lokmat Money >गुंतवणूक > ५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित

५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित

Buying a Home or Renting : जर एखाद्याला ५०,००० रुपये मासिक वेतन असेल तर त्याने नवीन घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. आज याचं सविस्तर गणित समजून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:26 IST2025-05-15T13:25:26+5:302025-05-15T13:26:25+5:30

Buying a Home or Renting : जर एखाद्याला ५०,००० रुपये मासिक वेतन असेल तर त्याने नवीन घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. आज याचं सविस्तर गणित समजून घेऊ.

Should you rent or buy a home in 2025 what is the smarter financial move for you | ५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित

५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित

Buying a Home or Renting : आजच्या काळात स्वतःचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, शहरांमध्ये घरांच्या वाढत्या किमती आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे अनेकदा हा निर्णय घेणे सोपे नसते. जर एखाद्याचा पगार ५० हजार रुपये असेल, तर घर खरेदी करावे की भाड्याने राहावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही देखील नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करेल.

घर खरेदीपूर्वी आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या
समजा रमेश नावाच्या एका तरुणाला ५० हजार मासिक वेतन आहे. तर त्याला घर खरेदी करण्यासाठी किमान १०-२०% डाउन पेमेंट आवश्यक असेल. ५० लाख रुपयांच्या घरासाठी ५-१० लाख रुपये लागतील. रमेशकडे इतकी बचत आहे का? घर खरेदी करण्यापूर्वी, रमेशने आपत्कालीन निधीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जो किमान ६ महिन्यांचा पगार असावा.

घर खरेदीचे फायदे

  • मालकी हक्क: स्वतःच्या घराची मालकी मिळवणं ही एक मोठी सुरक्षिततेची भावना देते.
  • गुंतवणूक: घर ही एक दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते, ज्याची किंमत कालांतराने वाढू शकते.
  • स्थिरता: भाड्याच्या घरामध्ये वारंवार बदल करण्याची गरज भासत नाही, त्यामुळे जीवनात स्थिरता येते.
  • भाड्याच्या खर्चातून मुक्ती: दीर्घकाळानंतर तुम्हाला भाड्याचा खर्च द्यावा लागत नाही.

घर खरेदीतील अडचणी

  • मोठी गुंतवणूक: घर खरेदीसाठी मोठी रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरावी लागते आणि कर्जाचा भार येतो.
  • ईएमआयचा बोजा: कर्जावरील मासिक हप्ता (EMI) तुमच्या मासिक खर्चात मोठी भर घालू शकतो.
  • इतर खर्च: घराची देखभाल, दुरुस्ती, मालमत्ता कर (property tax) आणि विमा यांसारखे अतिरिक्त खर्च असतात.
  • दीर्घकाळची बांधिलकी: घर खरेदी म्हणजे बँकेच्या कर्जासोबत दीर्घकाळची बांधिलकी स्वीकारणे.
  • तरलता कमी: गरज पडल्यास घर लगेच विकून पैसे मिळवणे कठीण होऊ शकते.

नवीन घरासाठी जवळपास दुप्पट किंमत मोजावी लागते
उदाहरणार्थ, जर रमेशने ५० लाख रुपयांचे घर खरेदी केले तर त्याला किमान २० टक्के, म्हणजेच १० लाख रुपये डाउन पेमेंट म्हणून द्यावे लागतील. मग ८% व्याजदराने ४० लाख रुपयांच्या कर्जावर, रमेशला २० वर्षांत सुमारे ४८ लाख रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागतील. म्हणजेच राजनला २० वर्षांत एकूण ९८ लाख रुपये द्यावे लागतील. यासाठा मासिक ईएमआय ३५ हजारांच्या पुढे भरावा लागेल.

अशा परिस्थितीत, ५०,००० रुपयांच्या पगारावर, रमेशला घर खरेदी करण्यासाठी दरमहा ३६,५०० रुपये खर्च करावे लागतील, जे रमेशच्या उत्पन्नाच्या ७३-७७% आहे, हा आर्थिकदृष्ट्या धोकादायक निर्णय असू शकतो. त्यामुळे, ५० लाख रुपयांचे घर खरेदी करणे हा रमेशसाठी पूर्णपणे चुकीचा निर्णय असेल. अशा परिस्थितीत, रमेशने पगारवाढीची वाट पहावी किंवा स्वस्त घराचा पर्याय निवडावा, ज्याची किंमत जास्तीत जास्त २५-३० लाख रुपये असेल. याचा अर्थ घराचा ईएमआय पगाराच्या जास्तीत जास्त ३० ते ४०% असावा. घराचा कमाल EMI दरमहा १५ ते १८ हजार रुपये असावा.

भाड्याने राहण्याचे फायदे
कमी खर्च: भाड्याने राहण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याची गरज नसते. फक्त डिपॉझिट आणि मासिक भाडे पुरेसे असते.
जागा बदलण्याची सोय: नोकरी किंवा इतर कारणांमुळे शहर बदलणे सोपे होते.
देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी नाही: घराची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी मालकाची असते.
गुंतवणुकीसाठी अधिक पैसे: घर खरेदी न केल्यास गुंतवणुकीसाठी अधिक पैसे उपलब्ध होऊ शकतात.
गुंतवणूक : भाड्याने राहून तुम्ही वाचवलेले पैसे शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर उच्च परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत गुंतवले जाऊ शकतात. दीर्घकाळात, हे घर खरेदी करण्यापेक्षा जास्त परतावा देऊ शकते.

भाड्याने राहिल्यास गणित कसं असेल?
रमेशचा पगार ५०,००० रुपये आहे. साधारण १बीएचके फ्लॅटची किंमत ४०-५० लाख रुपये असेल तर तिथे भाडे १५,००० ते २०००० रुपये प्रति महिना असू शकते. ५०,०००- १८,००० = ३२,००० रुपये (याचा काही भाग इतर खर्चासाठी जाईल, तरीही रमेश १५,०००-२०,००० रुपये वाचवू शकतो. दुसरीकडे, जर रमेशने भाड्याने राहून दरमहा १५,००० रुपयांची एसआयपी केली तर तो भविष्यात मोठा फंड जमा करू शकतो.

वाचा - तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?

जर १५,००० रुपयांचा मासिक एसआयपी वार्षिक १२ टक्के परतावा देत असेल, तर २० वर्षांनी राजनला सुमारे १,४९,८७,२१९ रुपये मिळतील. या कालावधीत, रमेशने ३६ लाख रुपये गुंतवले असतील. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
 

Web Title: Should you rent or buy a home in 2025 what is the smarter financial move for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.