Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > 'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज

'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज

Sahara Group : देशभरातील लाखो गुंतवणूकदारांनी सहाराच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक केली होती. सरकारने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी एक पोर्टल सुरू केले, ज्याने परतफेड प्रक्रिया सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:03 IST2025-11-28T12:19:46+5:302025-11-28T13:03:52+5:30

Sahara Group : देशभरातील लाखो गुंतवणूकदारांनी सहाराच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक केली होती. सरकारने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी एक पोर्टल सुरू केले, ज्याने परतफेड प्रक्रिया सुरू केली आहे.

Sahara Refund Portal How to Claim Your Stuck Money Online from 4 Co-operative Societies | 'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज

'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज

Sahara Group : सहारा समूहाच्या गुंतवणूक योजनांमध्ये देशभरातील लाखो ठेवीदारांचे पैसे अनेक वर्षांपासून अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने याच वर्षी जुलैमध्ये एक विशेष पोर्टल सुरू केले आहे, ज्यामुळे सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने सहारा समूहाच्या चार सहकारी सोसायट्यांच्या ठेवीदारांसाठी परताव्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या कष्टाच्या कमाईची वाट पाहणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

किती गुंतवणूकदारांना मिळणार परतावा?
सहारा कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून २४,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम अवैध मार्गाने जमा केली आणि ती परत केली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. या कंपन्या आणि त्यांचे मालक सुब्रत रॉय यांच्यावर पॉन्झी स्कीम चालवणे आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लागले होते. सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने माहिती दिली की, सुमारे ५.४३ कोटी गुंतवणूकदारांनी १,१३,५०४.१२४ कोटी रुपयांचा दावा केला होता. त्यापैकी २६,२५,०९० वास्तविक ठेवीदारांना एकूण ५,०५३.०१ कोटी रुपये परत केले गेले आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत सुमारे ३२ लाख गुंतवणूकदार आपले दावे दाखल करतील, असा अंदाज आहे.

कोणाला मिळेल रिफंड?

  • ज्या गुंतवणूकदारांनी खालील चार सहारा ग्रुपच्या को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना आता परतावा मिळेल.
  • सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (लखनऊ)
  • सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पस सोसायटी लिमिटेड (लखनऊ)
  • हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (कोलकाता)
  • स्टार्स मल्टीपर्पस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड
  • या सोसायट्यांचे गुंतवणूकदार आता कोणत्याही कार्यालयात न जाता, ऑनलाइनच आपल्या परताव्याचा दावा करू शकतात.

सीआरसीएस सहारा रिफंड पोर्टल काय आहे?
सीआरसीएस (सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज) सहारा रिफंड पोर्टल ही एक सरकारी वेबसाइट आहे. सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी परताव्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी ही वेबसाइट बनवण्यात आली आहे. हा एक सुरक्षित मार्ग आहे, ज्यात कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. ज्या गुंतवणूकदारांनी चारही सोसायट्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत, ते एकच फॉर्म भरून सर्व ठेवींचा दावा करू शकतात.

रिफंड मिळवण्याची सोपी ऑनलाइन प्रक्रिया

  1. पोर्टलच्या होमपेजवर 'रजिस्ट्रेशन' वर क्लिक करा.
  2. तुमचा आधार क्रमांक आणि त्याला जोडलेला मोबाइल नंबर टाका. कॅप्चा भरून 'गेट ओटीपी' वर क्लिक करा आणि तो ओटीपी वेरिफाय करा.
  3. नोंदणीनंतर 'डिपॉझिटर लॉगिन' वर जाऊन ओटीपीने वेरिफाय करा. तुमची माहिती आपोआप दिसेल.
  4. 'क्लेम फॉर्म'मध्ये तुमच्या सोसायटीचे नाव निवडा, जमा रकमेचा तपशील द्या आणि पासबुक किंवा सर्टिफिकेट नंबरसारखी माहिती भरा.

वाचा - तुमचे जुने आणि फाटकी अंतर्वस्त्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सिक्रेट सांगतात! काय आहे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'?

योग्य कागदपत्रे आणि माहिती देऊन गुंतवणूकदार आता आपले अडकलेले पैसे परत मिळवू शकतात.

Web Title : सहारा में फंसे करोड़ों रुपये वापस मिलेंगे; ऑनलाइन आवेदन उपलब्ध!

Web Summary : सहारा समूह के लाखों निवेशकों को एक विशेष सरकारी पोर्टल के माध्यम से अपनी फंसी हुई धनराशि वापस मिल सकती है। सुप्रीम कोर्ट के आदेश के बाद शुरू हुई इस प्रक्रिया से सहारा की चार सहकारी समितियों के निवेशक धन वापसी के लिए ऑनलाइन आवेदन कर सकते हैं, जिससे कई लोगों को राहत मिलेगी।

Web Title : Millions trapped in Sahara to be returned; online application available!

Web Summary : Millions of Sahara Group investors can reclaim their long-stuck funds via a special government portal. The process, initiated after a Supreme Court order, allows investors of four Sahara cooperative societies to apply online for refunds, bringing relief to many.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.