Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > श्रीमंत व्हायचेय? मग 'या' ३ गोष्टींत गुंतवणूक करा; 'रिच डॅड' फेम कियोसाकींनी दिला यशाचा पासवर्ड

श्रीमंत व्हायचेय? मग 'या' ३ गोष्टींत गुंतवणूक करा; 'रिच डॅड' फेम कियोसाकींनी दिला यशाचा पासवर्ड

Robert Kiyosaki Gold-Silver : 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढ-उतारांबद्दल त्यांच्या नवीन पोस्टमध्ये मत व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 16:14 IST2026-01-25T16:09:58+5:302026-01-25T16:14:49+5:30

Robert Kiyosaki Gold-Silver : 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढ-उतारांबद्दल त्यांच्या नवीन पोस्टमध्ये मत व्यक्त केले आहे.

Robert Kiyosaki's Investment Advice Why He Doesn't Care About Gold & Bitcoin Price Flips | श्रीमंत व्हायचेय? मग 'या' ३ गोष्टींत गुंतवणूक करा; 'रिच डॅड' फेम कियोसाकींनी दिला यशाचा पासवर्ड

श्रीमंत व्हायचेय? मग 'या' ३ गोष्टींत गुंतवणूक करा; 'रिच डॅड' फेम कियोसाकींनी दिला यशाचा पासवर्ड

Robert Kiyosaki Gold-Silver : 'रिच डॅड, पुअर डॅड' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचा धाडसी सल्ला दिला आहे. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारांची आपल्याला अजिबात पर्वा नसल्याचे सांगत, त्यांनी संपत्ती निर्माण करण्याचा एक नवा दृष्टीकोन मांडला आहे.

कियोसाकींचा रोखठोक पवित्रा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपल्या ताज्या पोस्टमध्ये कियोसाकी यांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारला: "सोने, चांदी किंवा बिटकॉइनच्या किमती कमी-जास्त झाल्या तर मला त्याची काळजी वाटते का?" याचे उत्तर त्यांनी अत्यंत स्पष्टपणे 'नाही' असे दिले आहे.

सोने-चांदीविषयी रॉबर्ट कियोसाकी इतके ठाम का?

  • अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज सातत्याने वाढत आहे.
  • अमेरिकन डॉलरची खरेदी क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे.
  • फेडरल रिझर्व्ह आणि अमेरिकन सरकारच्या आर्थिक धोरणांवर त्यांनी टीका केली असून, जोपर्यंत हे घटक अर्थव्यवस्था नियंत्रित करत आहेत, तोपर्यंत सोने-चांदीसारखी सुरक्षित मालमत्ता खरेदी करत राहणे हाच श्रीमंत होण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चांदीबाबतची भविष्यवाणी ठरतेय खरी!
कियोसाकी यांनी काही काळापूर्वी चांदीच्या दराबाबत २०० डॉलर्सचे उद्दिष्ट दिले होते. सध्याची बाजारपेठ पाहता त्यांची ही भविष्यवाणी सत्यात उतरताना दिसत आहे. भारतीय बाजारातही चांदीने गेल्या काही दिवसात सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

चांदीचा बाजारात धुमाकूळ
भारतात चांदीने पहिल्यांदाच ३ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे.
मागील आठवड्याच्या शेवटी किरकोळ घसरण होऊनही, चांदीचा भाव ३,१७,७०५ रुपये प्रति किलोवर बंद झाला, तर जागतिक बाजारात हा दर ३,४०,६०० रुपयांच्या जवळपास पोहोचला होता.

वाचा - मेंटेनन्स भरायचा नाही, उलट वर्षाला मिळणार २.५ लाख! मुंबईतील सोसायटीचे अजब मॉडेल; उद्योजकही थक्क

गुंतवणूकदारांना काय संदेश?
कियोसाकी यांच्या मते, किमतीतील अल्पकालीन चढ-उतारांकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक सोने, चांदी आणि बिटकॉइन जमा करणे हाच भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा आधार आहे. "मी फक्त खरेदी करत राहतो आणि श्रीमंत होत जातो," असे सांगून त्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : रॉबर्ट कियोसाकी: संपत्ति के लिए कीमतों की अस्थिरता के बावजूद सोना, चांदी खरीदें।

Web Summary : रॉबर्ट कियोसाकी सोने, चांदी और बिटकॉइन में निवेश करने की सलाह देते हैं, कीमतों के उतार-चढ़ाव को अनदेखा करते हैं। वह बढ़ते अमेरिकी ऋण और डॉलर के अवमूल्यन के बीच संपत्ति जमा करने पर जोर देते हैं, इसे धन का मार्ग मानते हैं। उन्होंने चांदी के 200 डॉलर तक पहुंचने की भविष्यवाणी की; यह अब बढ़ रहा है।

Web Title : Robert Kiyosaki: Buy gold, silver despite price volatility for wealth.

Web Summary : Robert Kiyosaki advises investing in gold, silver, and Bitcoin, disregarding price fluctuations. He emphasizes accumulating assets amidst rising US debt and dollar devaluation, viewing it as a path to wealth. He predicted silver hitting $200; it's now surging.