Retirement Planning: तुम्ही जर खासगी क्षेत्रात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर निवृत्ती नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. म्हातारपणाला कोण घाबरत नाही? शरीर थकले की मनापासून हातापर्यंतची ताकद कमी होऊ लागते. निवृत्तीनंतर उत्पन्नाचा आधार नाही. अशा परिस्थितीत काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण जर तुम्ही वेळेत नियोजन केले तर तुमचे म्हातारपण आनंदात जाईल. हा संपूर्ण लेख वाचल्यानंतर तुमची म्हातारपणाची काळजी निघून जाईल.
निवृत्ती नियोजन करण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही यासाठी पुरेसे पैसे वाचवत आहात का? जर तुम्ही पैशाची चांगली बचत करत असाल तर ते योग्य ठिकाणी गुंतवत आहात का? कारण, फक्त पैसे वाचवून उपयोग नाही. तर ते पैसे पॅसिव उत्पन्नात बदलणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक विचार करुन एसआयपी, ईपीएफ आणि एनपीएस सारख्या योजनांमध्ये पैसे योग्य प्रकारे गुंतवले, तर निवृत्तीनंतरही तुम्हाला पगारासारखे उत्पन्न मिळत राहील.
आर्थिक भविष्यासाठी सुरक्षित नियोजन करा
तुमच्या आर्थिक भविष्यासाठी सुरक्षित नियोजन करून तुम्ही निवृत्तीनंतरच्या आर्थिक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. निवृत्तीच्या वेळी गरजांसाठी सक्रिय नियोजन केले पाहिजे, असे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्ही तुमच्या SIP मध्ये चार टप्प्यांत गुंतवणूक करावी. यामुळे तुम्हाला महागाईपेक्षा १० टक्के जास्त वार्षिक परतावा मिळेल. तुम्ही तुमच्या भविष्य निर्वाह निधीमध्येही मोठी रक्कम जमा करू शकता. इथे ८.१५ टक्के परतावा मिळतो. तुम्ही तुमच्या EPF मध्ये १२ टक्क्यांहून अधिक योगदान देऊ शकता. तुमचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असल्यास, तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक करू शकता. NPS हा इक्विटी आणि डेटचा मिश्रित लाइफस्टाइल फंड आहे. यामध्ये ७५ टक्के इक्विटी आणि २५ टक्के डेट यांचे मिश्रण आहे.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हा देखील एक चांगला पर्याय
तुमच्या वृद्धापकाळात हक्कार घर किंवा जमीन असेल तर त्याची मजाच वेगळी आहे. त्यामुळे निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करा. हे तुम्हाला ८-९ टक्के वार्षिक परतावा देऊ शकते.