Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > स्वतःचं घर की भाड्याचं बिऱ्हाड? गोंधळला असाल तर वापरा '१% नियम'; खरेदीपूर्वी हे गणित नक्की समजून घ्या!

स्वतःचं घर की भाड्याचं बिऱ्हाड? गोंधळला असाल तर वापरा '१% नियम'; खरेदीपूर्वी हे गणित नक्की समजून घ्या!

Rent Vs Buy : घर खरेदी करणे चांगले की भाड्याने घेणे चांगले असा प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी पडतो. ही कोंडी कमी करण्यासाठी, १% भाडे विरुद्ध खरेदी नियम नावाचा एक सोपा गुंतवणूक सूत्र आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:43 IST2026-01-18T13:41:21+5:302026-01-18T13:43:42+5:30

Rent Vs Buy : घर खरेदी करणे चांगले की भाड्याने घेणे चांगले असा प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी पडतो. ही कोंडी कमी करण्यासाठी, १% भाडे विरुद्ध खरेदी नियम नावाचा एक सोपा गुंतवणूक सूत्र आहे.

Rent vs Buy: How the 1% Rule Can Guide Your Home Purchase Decision | स्वतःचं घर की भाड्याचं बिऱ्हाड? गोंधळला असाल तर वापरा '१% नियम'; खरेदीपूर्वी हे गणित नक्की समजून घ्या!

स्वतःचं घर की भाड्याचं बिऱ्हाड? गोंधळला असाल तर वापरा '१% नियम'; खरेदीपूर्वी हे गणित नक्की समजून घ्या!

Rent Vs Buy : दरमहा घराचं भाडं भरताना "स्वतःचं घर असतं तर बरं झालं असतं" असा विचार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात एकदा तरी येतोच. पण गृहकर्जाचा मोठा ईएमआय आणि २०-२५ वर्षांचा कालावधी ऐकला की पुन्हा पाऊल मागे पडतं. घर खरेदी करणं फायद्याचं आहे की भाड्याने राहणं, या वादावर '१% नियम' हे एक प्रभावी उत्तर ठरू शकतं.

काय आहे हा '१% नियम'?
या नियमानुसार, जर एखाद्या घराचे मासिक भाडे हे त्या घराच्या एकूण किमतीच्या किमान १ टक्का असेल, तर ती मालमत्ता खरेदी करणे ही एक चांगली गुंतवणूक मानली जाते. उदाहरण: समजा, एका फ्लॅटची किंमत १ कोटी रुपये आहे. जर त्या घराचे मासिक भाडे सुमारे १ लाख रुपये मिळत असेल, तरच ते घर खरेदी करणे फायद्याचे ठरते. जर भाडे यापेक्षा खूपच कमी असेल, तर ती गुंतवणूक तोट्याची ठरू शकते.

असे करा तुमच्या 'भाडे उत्पन्ना'चे गणित

  • तुमच्या परिसरातील घरांची किंमत आणि भाडे यांचा ताळमेळ बसवण्यासाठी खालील सूत्र वापरा.
  • (मासिक भाडे ÷ घराची एकूण किंमत) × १००
  • जर हे उत्तर १% च्या आसपास येत असेल, तर घर खरेदीचा विचार नक्कीच करता येईल. मात्र, हे ठरवताना मेंटेनन्स खर्च, प्रॉपर्टी टॅक्स, मुद्रांक शुल्क आणि गृहकर्जाचे व्याज या गोष्टींचाही विचार करणे आवश्यक आहे.

भारतात हा नियम तंतोतंत लागू होतो का?

  1. रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, हा नियम भारतासारख्या देशात पूर्णपणे तंतोतंत लागू होत नाही.
  2. भाडे उत्पन्न : विकसित देशांच्या तुलनेत भारतात निवासी मालमत्तेचे सरासरी 'रेंटल यील्ड' (भाड्याचे उत्पन्न) केवळ २% च्या आसपास असते. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने हा नियम भारतात आव्हानात्मक ठरतो.
  3. मोठी शहरे : मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, पण त्या प्रमाणात भाडे वाढत नाही. अशा वेळी मोठ्या शहरात भाड्याने राहणे अधिक शहाणपणाचे ठरू शकते.
  4. लहान शहरे : याउलट, विकसित होणाऱ्या किंवा लहान शहरांमध्ये घर खरेदी करणे हा उत्तम पर्याय असू शकतो.

वाचा - सोने की चांदी? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर; वाचा १८ जानेवारीचे संपूर्ण मार्केट अपडेट

केवळ गणितच नाही, तर भावनाही महत्त्वाच्या!
शेवटी घर खरेदी करणे हा केवळ गणिताचा भाग नाही. नोकरीची स्थिरता, कुटुंबाच्या गरजा, कर सवलत आणि मानसिक समाधान या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. '१% नियम' तुम्हाला दिशा दाखवू शकतो, पण अंतिम निर्णय तुमच्या आर्थिक क्षमतेवर आणि वैयक्तिक गरजांवरच अवलंबून असावा.
 

Web Title : किराए पर या खरीदें? समझदारी से फैसला लेने के लिए '1% नियम' का उपयोग करें!

Web Summary : किराए पर रहने या खरीदने को लेकर उलझन है? '1% नियम' सुझाव देता है कि यदि मासिक किराया संपत्ति मूल्य के 1% के बराबर हो तो खरीदें। निर्णय लेने से पहले रखरखाव, करों और व्यक्तिगत जरूरतों पर विचार करें। यह सिर्फ गणित नहीं है; भावनाएं भी मायने रखती हैं। स्थिरता और पारिवारिक जरूरतों का आकलन करें।

Web Title : Rent or Buy? Use the '1% Rule' to Decide Wisely!

Web Summary : Confused about renting versus buying? The '1% rule' suggests buying if monthly rent equals 1% of the property value. Consider maintenance, taxes, and personal needs before deciding. It's not just math; emotions matter, too. Assess stability and family needs.