Lokmat Money >गुंतवणूक > रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

Gold Price Today 4th August : तुम्ही जर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:59 IST2025-08-04T12:52:48+5:302025-08-04T12:59:44+5:30

Gold Price Today 4th August : तुम्ही जर सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

RBI Meeting Begins Gold and Silver Prices See increase Across India | रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. देशभरात सोन्याच्या किमतीमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. एकीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नाणे समितीची बैठक आजपासून सुरू झाली असून, ६ ऑगस्ट रोजी रेपो दराबाबत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. यापूर्वीच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. पण, ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे. त्यांच्यासाठी ही वाढ लाभदायक आहे. कारण, त्यांचे पैसे वाढले आहेत.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर

  • आज, २४ कॅरेट सोन्याचे दर (१० ग्रॅम) आणि २२ कॅरेट सोन्याचे दर (१० ग्रॅम) खालीलप्रमाणे आहेत. या किमती कर आणि मेकिंग चार्जेसशिवाय आहेत.
  • मुंबई: २४ कॅरेट सोने १,०१,४०० रुपये, तर २२ कॅरेट सोने ९२,८९० रुपये दराने विकले जात आहे. चांदीचा दर १,१२,९०० रुपये प्रति किलो आहे.
  • दिल्ली: २४ कॅरेट सोने १,०१,४९० रुपये, तर २२ कॅरेट सोने ९३,०४० रुपये दराने उपलब्ध आहे.
  • अहमदाबाद आणि पटना: २४ कॅरेट सोने १,०१,३९० रुपये, तर २२ कॅरेट सोने ९२,९४० रुपये दराने विकले जात आहे.
  • हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता: या शहरांमध्येही २४ कॅरेट सोने १,०१,३४० रुपये, तर २२ कॅरेट सोने ९२,८९० रुपये दराने व्यवहार करत आहे. हे दर https://www.goodreturns.in/gold-rates/ या वेबसाईटनुसार आहेत. प्रत्येक शहराचे दर हे त्या ठिकाणच्या सराफा बाजारानुसार वेगळे असू शकतात.

वाचा - AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..

सोने आणि चांदीचे दर कसे ठरतात?
सोन्याचे आणि चांदीचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात. यामध्ये डॉलर आणि रुपयामधील विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यांचा समावेश असतो. भारतात सोन्याला सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. लग्न, सण आणि इतर शुभप्रसंगी सोन्याची खरेदी केली जाते, त्यामुळे त्याची मागणी नेहमीच जास्त असते. त्यामुळे हे दर सतत बदलत राहतात.

Web Title: RBI Meeting Begins Gold and Silver Prices See increase Across India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.