PPF calculation: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते की, निवृत्ती किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आणि सुरक्षित निधी तयार व्हावा. पण प्रश्न तोच की, एवढा पैसा येणार कुठून? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे Public Provident Fund (PPF). सरकारी हमी, करमुक्त परतावा आणि दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूकीमुळे PPF हा आजही सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. योग्य नियोजन केल्यास, २० वर्षांत सुमारे ₹६७ लाखांचा निधी तयार होऊ शकतो.
या ६ मुद्द्यांत समजून घ्या संपूर्ण प्लॅन
- वार्षिक गुंतवणूक: ₹१.५ लाख
- मासिक गुंतवणूक: ₹१२,५००
- व्याजदर: ७.१%
- कालावधी: २० वर्षे
- एकूण गुंतवणूक: ₹३० लाख
- मिळालेले व्याज: ₹३६,५८,२८८
- मॅच्युरिटी रक्कम: सुमारे ₹६७ लाख
म्हणजेच तुमची गुंतवणूक दुप्पटपेक्षा जास्त होते.
PPF इतका लोकप्रिय का आहे? ३ मुख्य कारणे
- सरकारी हमी - पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक
- टॅक्स-फ्री रिटर्न - मिळणाऱ्या व्याजावर कर नाही
- नो-रिस्क इन्व्हेस्टमेंट - बाजारातील चढ-उताराचा परिणाम नाही
PPF ची सर्वात मोठी ताकद: EEE स्टेटस
- गुंतवणुकीवर कर सवलत
- व्याज पूर्णपणे करमुक्त
- मॅच्युरिटी रक्कमही करमुक्त
जर तुम्ही नोकरदार आहात, रिस्क घ्यायचा नाही आणि दीर्घकालीन प्लॅनिंग करत आहात, तर PPF हा तुमच्या गुंतवणुकीचा मजबूत पाया ठरू शकतो. यात संपूर्ण पैसा तुमचाच राहतो आणि कोणतीही कपात होत नाही. दरमहा ऑटो-इन्व्हेस्टमेंट सुरू करा, वर्षाअखेरीची वाट पाहू नका. PPF ला दीर्घकालीन प्लॅनचा भाग बनवा आणइ SIP सारख्या इतर गुंतवणुकीसोबत संतुलन ठेवा. PPF ही पटकन श्रीमंत होण्याची योजना नाही, पण दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण करणारे प्रभावी साधन आहे. शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास २० वर्षांनंतर ₹६७ लाख हा फक्त आकडा नसून तुमच्या सुरक्षित भविष्याची हमी ठरू शकतो.
