Post Office NSC Scheme : शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात सामान्य गुंतवणूकदार नेहमीच 'सुरक्षित आणि गॅरंटीड' परतावा देणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतो. अशा गुंतवणूकदारांसाठी भारतीय टपाल विभागाची 'नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट' ही योजना एक उत्तम केंद्र सरकार संचलित पर्याय ठरत आहे. या योजनेत केवळ मुद्दल सुरक्षित राहत नाही, तर चक्रवाढ व्याजाच्या जोरावर एक मोठा निधीही तयार होतो.
७.७% व्याजदर आणि चक्रवाढ व्याजाची जादू
सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर वार्षिक ७.७% दराने व्याज मिळत आहे. विशेष म्हणजे, या व्याजाची गणना दरवर्षी केली जाते, मात्र त्याचे प्रदान ५ वर्षांची मुदत संपल्यानंतरच केले जाते.
गुंतवणुकीचे गणित
जर तुम्ही आज या योजनेत २,५०,००० रुपये एकरकमी गुंतवले, तर ५ वर्षांनंतर तुम्हाला त्यावर १,१६,०६२ रुपये केवळ व्याजापोटी मिळतील. म्हणजेच ५ वर्षांनी तुमच्या हातात एकूण ३,६६,०६२ रुपये असतील.
वाचा - झोमॅटो दरमहा २ लाख लोकांना रोजगार देते, तर तवेढच लोक नोकरीही सोडतात; गोयल यांनी सांगितलं कारण
कर बचतीचा दुहेरी फायदा
'एनएससी'मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आयकराच्या कलम ८०-सी अंतर्गत मिळणारी सवलत. गुंतवणूकदार दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर वजावट मिळवू शकतात. दरवर्षी मिळणारे व्याज हे पुन्हा गुंतवले जाते असे मानले जाते, त्यामुळे शेवटचे वर्ष वगळता व्याजावरही कर सवलत मिळते.
