Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > दागिने की डिजिटल गोल्ड? कोणत्या पर्यायात सर्वाधिक फायदा? गुंतवणुकीपूर्वी 'हे' आर्थिक गणित नक्की वाचा!

दागिने की डिजिटल गोल्ड? कोणत्या पर्यायात सर्वाधिक फायदा? गुंतवणुकीपूर्वी 'हे' आर्थिक गणित नक्की वाचा!

Gold Investment Tips : अनेकजण गुंतवणूक म्हणून सोन्याचे जागिने खरेदी करतात पण यात खरच फायदा होतो का? तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 15:29 IST2026-03-15T15:22:00+5:302026-03-15T15:29:00+5:30

Gold Investment Tips : अनेकजण गुंतवणूक म्हणून सोन्याचे जागिने खरेदी करतात पण यात खरच फायदा होतो का? तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की वाचा.

Physical Gold vs Smart Gold Investment: Why Sovereign Gold Bond is Better than Jewelry? | दागिने की डिजिटल गोल्ड? कोणत्या पर्यायात सर्वाधिक फायदा? गुंतवणुकीपूर्वी 'हे' आर्थिक गणित नक्की वाचा!

दागिने की डिजिटल गोल्ड? कोणत्या पर्यायात सर्वाधिक फायदा? गुंतवणुकीपूर्वी 'हे' आर्थिक गणित नक्की वाचा!

Gold Investment Tips : भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ दागिना म्हणून नाही, तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. विशेषतः लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे कल असतो. मात्र, अलीकडे 'स्मार्ट गोल्ड' म्हणजेच सोव्हरिन गोल्ड बाँडकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढतोय. सोशल मीडियावरील एका व्हायरल माहितीनुसार, फिजिकल गोल्डच्या तुलनेत स्मार्ट गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

छुपे खर्च आणि तोटा?

सोन्याचे दागिने खरेदी करताना आपल्याला केवळ सोन्याची किंमत द्यावी लागत नाही, तर त्यावर अनेक अतिरिक्त शुल्क आकारले जातात. १०२ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचे एक उदाहरण घेऊ:

  • सोन्याची मूळ किंमत : १६,७२,०९०
  • मेकिंग चार्जेस (१५%) : २,५०,८१४
  • जीएसटी (३%) : ५०,१६३
  • वेस्टेज (५%) : ८३,६०४
  • एकूण खर्च : २०,५६,६७१

म्हणजेच, २०.५ लाख रुपये खर्च करून तुमच्या हातात प्रत्यक्षात फक्त १६.७ लाखांचे सोने येते. सुमारे ३.८ लाख रुपये केवळ चार्जेस आणि टॅक्समध्ये खर्च होतात, ज्याचा परतावा विक्रीच्या वेळी मिळत नाही.


स्मार्ट ऑप्शन: सोव्हरिन गोल्ड बाँड

  • जर तुमचा उद्देश केवळ गुंतवणूक असेल, तर २० लाख रुपये सोव्हरिन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
  • शून्य मेकिंग चार्जेस: येथे दागिने घडवण्याचा कोणताही खर्च नसतो.
  • अतिरिक्त व्याज: गुंतवणुकीवर दरवर्षी २.५% निश्चित व्याज मिळते, जे दागिन्यांच्या बाबतीत शक्य नाही.
  • टॅक्स बेनिफिट: ८ वर्षांच्या मुदतीनंतर मिळणारा 'कॅपिटल गेन टॅक्स' पूर्णपणे शून्य असतो.
  • सुरक्षितता: चोरीला जाण्याची किंवा शुद्धतेची कोणतीही भीती नसते.

वाचा - शेअर बाजारात युद्धाचे सावट! ९ दिवसांत गुंतवणूकदारांचे २६ लाख कोटी पाण्यात; सेबी प्रमुखांनी दिला मोठा मंत्र

दागिने की गुंतवणूक?

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला लग्नासाठी किंवा वापरासाठी सोने हवे असेल, तर दागिने खरेदी करणे अपरिहार्य आहे. मात्र, जर तुम्ही भविष्यातील तरतूद म्हणून सोने घेत असाल, तर 'स्मार्ट गोल्ड' हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे तुमचे ३ ते ४ लाख रुपये वाचू शकतात आणि त्यावर व्याजही मिळते.

Web Title : ज्वेलरी या डिजिटल गोल्ड? अधिकतम लाभ के लिए स्मार्ट निवेश टिप्स।

Web Summary : सॉवरेन गोल्ड बॉन्ड जैसे स्मार्ट गोल्ड निवेश, फिजिकल गोल्ड की तुलना में बचत प्रदान करते हैं। गहनों पर उच्च मेकिंग चार्ज और टैक्स से बचें। बॉन्ड 2.5% ब्याज और कर लाभ प्रदान करते हैं, जो निवेश के लिए आदर्श हैं।

Web Title : Jewelry or Digital Gold? Smart Investment Tips for Maximum Profit.

Web Summary : Smart gold investments, like sovereign gold bonds, offer savings over physical gold. Avoid high making charges and taxes on jewelry. Bonds offer 2.5% interest and tax benefits, ideal for investment purposes.