Lokmat Money >गुंतवणूक > PF Withdrawal Rules : 'या' गरजांसाठी पीएफ खात्यातून काढू शकता पैसे, जाणून घ्या प्रोसेस

PF Withdrawal Rules : 'या' गरजांसाठी पीएफ खात्यातून काढू शकता पैसे, जाणून घ्या प्रोसेस

PF Withdrawal Rules : जर तुम्हाला मधल्या काळात काही अत्यंत महत्वाचं काम असेल तर, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातूनही पैसे काढू शकता. जाणून घेऊया पीएफ खात्यातून तुम्ही कधी पैसे काढू शकता आणि त्याची प्रक्रिया काय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:04 IST2025-01-03T10:04:42+5:302025-01-03T10:04:42+5:30

PF Withdrawal Rules : जर तुम्हाला मधल्या काळात काही अत्यंत महत्वाचं काम असेल तर, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातूनही पैसे काढू शकता. जाणून घेऊया पीएफ खात्यातून तुम्ही कधी पैसे काढू शकता आणि त्याची प्रक्रिया काय आहे.

PF Withdrawal Rules You can withdraw money from PF account for some needs know the process | PF Withdrawal Rules : 'या' गरजांसाठी पीएफ खात्यातून काढू शकता पैसे, जाणून घ्या प्रोसेस

PF Withdrawal Rules : 'या' गरजांसाठी पीएफ खात्यातून काढू शकता पैसे, जाणून घ्या प्रोसेस

PF Withdrawal Rules : जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर तुमचं ईपीएफओमध्येही (EPFO) खातं उघडलं असेल, ज्याला आपण पीएफ खातं म्हणतो. प्रत्येक महिन्याला कर्मचारी आणि कंपनीकडून पीएफ खात्यात काही रक्कम जमा केली जाते. हे पैसे कर्मचाऱ्याच्या निवृत्ती योजनेचा भाग आहेत. यातील काही योगदान पेन्शनसाठीही जातं. पण जर तुम्हाला मधल्या काळात काही अत्यंत महत्वाचं काम असेल तर, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातूनही पैसे काढू शकता. जाणून घेऊया पीएफ खात्यातून तुम्ही कधी पैसे काढू शकता आणि त्याची प्रक्रिया काय आहे.

अंशत: कधी पैसे काढता येतील?

  • स्वत:च्या किंवा मुलाच्या लग्नासाठी
  • घर विकत घेण्यासाठी
  • वैद्यकीय गरजांसाठी
  • घराचं नूतनीकरण करण्यासाठी
  • गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी
     

यापैकी बहुतांश अंशत: पैसे काढण्यासाठी ईपीएफओ सदस्य किमान पाच किंवा सात वर्षे ईपीएफ सदस्य असणं आवश्यक आहे.

पीएफमधून अंशत: पैसे काढण्याची प्रक्रिया

स्टेप १. आपल्याला यूएएन पोर्टलवर जावं लागेल आणि आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड एन्टर करावा लागेल.
स्टेप २. आधारशी जोडलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. हा ओटीपी आणि कॅप्चा टाका.
स्टेप ३. तुमचं प्रोफाईल पेज ओपन होईल. वेबपेजच्या वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला 'ऑनलाईन सर्व्हिसेस' हा पर्याय दिसेल. आता स्क्रोल डाऊन ऑप्शनमधून 'क्लेम'वर क्लिक करा.
स्टेप ४. आता तुम्हाला ईपीएफओशी लिंक केलेला बँक खाते क्रमांक टाकून सदस्यांच्या माहितीची पडताळणी करावी लागेल.
स्टेप ५. आता दावा केलेली रक्कम ईपीएफओकडून या बँक खात्यात जमा केली जाईल, असं सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग दिसेल. आता नियम आणि अटींसाठी तुम्हाला 'येस' वर क्लिक करावं लागेल.
स्टेप ६. आता तुम्ही ऑनलाइन क्लेमसाठी पुढे जाऊ शकता. या ऑप्शनवर क्लिक करताच एक सेक्शन ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला अधिक डिटेल्स एन्टर करावे लागतील.
स्टेप ७. येथे तुम्हाला तुमचा पत्ता द्यावा लागेल आणि स्कॅन केलेला चेक आणि फॉर्म १५ जी सारखी काही कागदपत्रं अपलोड करावी लागतील. अशा प्रकारे ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यासाठी तुम्हाला क्लेम सबमिट करता येईल.

Web Title: PF Withdrawal Rules You can withdraw money from PF account for some needs know the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.