Lokmat Money >गुंतवणूक > PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट

PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट

PF Withdrawal Through UPI : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आता आपल्या ईपीएफ खात्यातून सहज पैसे काढू शकणार आहेत. त्यांना एटीएम किंवा यूपीआयसारख्या पद्धतींचा वापर करता येणारे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:19 IST2025-06-25T11:05:21+5:302025-06-25T11:19:53+5:30

PF Withdrawal Through UPI : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आता आपल्या ईपीएफ खात्यातून सहज पैसे काढू शकणार आहेत. त्यांना एटीएम किंवा यूपीआयसारख्या पद्धतींचा वापर करता येणारे.

No worries about forms or tension about where to go You can withdraw money from EPF account through UPI big update | PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट

PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट

PF Withdrawal Through UPI : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आता आपल्या ईपीएफ खात्यातून सहज पैसे काढू शकणार आहेत. त्यांना एटीएम किंवा यूपीआयसारख्या पद्धतींचा वापर करता येणारे. कामगार मंत्रालय त्यावर काम करत आहे. यामुळे ईपीएफओ सदस्यांची मोठी सोय होईल. सध्या सदस्यांना पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी वेळ लागतो. आता त्यांना सहज आणि जलद पैसे काढता येणारेत.

कामगार मंत्रालय एका नव्या योजनेवर काम करत आहे. याअंतर्गत ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नवे मार्ग शोधले जातील. ईपीएफचा काही भाग रोखला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. उर्वरित रक्कम यूपीआय किंवा एटीएम कार्डवरून काढता येईल. यामुळे लोकांना पैसे काढणं सोपं होणारे.

भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?

सॉफ्टवेअरशी निगडीत काही समस्या

ही प्रणाली सुरू करण्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. सॉफ्टवेअरशी संबंधित काही समस्या आहेत, ज्या दुरुस्त केल्या जात आहेत. या समस्या दूर केल्यानंतर, ही सुविधा लवकरच सुरू होईल, असं त्यांनी नमूद केलं. सध्या ईपीएफओ सदस्यांना पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी बराच वेळ लागतो. पण, आता तसं होणार नाही. नव्या सुविधेमुळे त्यांना सहज पैसे काढता येणार आहेत.

ऑटो सेटलमेंट मर्यादेतही वाढ

ईपीएफओनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढली आहे. यापूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये होती. ती आता ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच आता पाच लाख रुपयांपर्यंतचे दावे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निकाली निघणार आहेत. 'ऑटोमॅटिक सेटलमेंट मोड'अंतर्गत कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अर्ज दाखल केल्यानंतर तीन दिवसांच्या आत पैसे काढण्याचे दावे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं निकाली काढले जातात. म्हणजेच अर्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत पैसे मिळतील.

या निर्णयाचा फायदा ईपीएफओच्या अनेक सदस्यांना होणार आहे. आजारपण, शिक्षण, लग्न, घर बांधणं अशा गोष्टींसाठी ते सहज पैसे काढू शकतील. त्यांना आता वाट पाहावी लागणार नाही. ते तीन दिवसांच्या आत ईपीएफचे पैसे वापरू शकतील. ईपीएफओ सदस्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. आता त्यांना त्यांचे पैसे सहज आणि जलद वापरता येणारेत.

Web Title: No worries about forms or tension about where to go You can withdraw money from EPF account through UPI big update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.