lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > उपकार कसे विसरू! ज्या IIT ने घडविले, माजी विद्यार्थ्याने 400 कोटी रुपये दिले

उपकार कसे विसरू! ज्या IIT ने घडविले, माजी विद्यार्थ्याने 400 कोटी रुपये दिले

सहकाऱ्यांसोबत लाखो कोटी रुपयांची कंपनी उभारली, पण मुंबई आयआयटीला नाही विसरले नंदन निलेकणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 03:07 PM2023-06-20T15:07:06+5:302023-06-20T16:25:31+5:30

सहकाऱ्यांसोबत लाखो कोटी रुपयांची कंपनी उभारली, पण मुंबई आयआयटीला नाही विसरले नंदन निलेकणी

Nandan Nilekani: co-founder of infosys Nandan Nilekani donated 315 crores to his alma mater IIT Bombay | उपकार कसे विसरू! ज्या IIT ने घडविले, माजी विद्यार्थ्याने 400 कोटी रुपये दिले

उपकार कसे विसरू! ज्या IIT ने घडविले, माजी विद्यार्थ्याने 400 कोटी रुपये दिले

Nandan Nilekani: अनेकजण आपल्या करिअरमध्ये उच्च पदावर गेल्यावरही आपल्याला घडवणाऱ्या शाळेला किंवा कॉलेजला विसरत नाही. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी(Nandan Nilekani) हे यापैकीच एक आहेत. ते आपल्याला घडवणाऱ्या कॉलेजला आजही विसरेल नाहीत. अलीकडेच कॉलेज पूर्ण करुन 50 वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेला 315 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. 

नंदन नीलेकणी यांनी 1973 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवण्यासाठी संस्थेत प्रवेश घेतला होता. संस्थेतील पायाभूत सुविधांना चालना देणे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संशोधनास प्रोत्साहन देणे, हे या देणगीमागचे उद्दिष्ट आहे. त्यांची ही देणगी एखाद्या माजी विद्यार्थ्याने केलेली सर्वात मोठी देणगी ठरली आहे. 

याबाबत नीलेकणी म्हणाले, “आयआयटी-बॉम्बे माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे. संस्थेने माझ्या सुरुवातीच्या वर्षांना आकार दिला, माझ्या प्रवासाचा पाया रचला आहे. मी या प्रतिष्ठित संस्थेशी माझ्या सहवासाची 50 वर्षे साजरी करत आहे, म्हणूनच ही देणगी देण्याचा निर्णय घेतला. ही देणगी आर्थिक योगदानापेक्षा खूप जास्त आहे. ज्या जागेने मला खूप काही दिले, त्याबद्दलची ही कृतज्ञता आणि उद्याचे आपले जग घडवणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती असलेली वचनबद्धता आहे.''

आयआयटी बॉम्बेचे संचालक, प्राध्यापक सुभाष चौधरी म्हणाले, आमचे नामवंत माजी विद्यार्थी नंदन नीलेकणी यांनी संस्थेसाठी इतके मोठे योगदान देताना पाहून आम्हाला आनंद होत आहे. ही ऐतिहासिक देणगी आयआयटी बॉम्बेच्या वाढीला लक्षणीयरीत्या गती देईल. विशेष म्हणजे, नंदन नीलेकणी यांनी यापूर्वीही संस्थेला 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यांचे एकूण योगदान 400 कोटी रुपये झाले आहे.

Web Title: Nandan Nilekani: co-founder of infosys Nandan Nilekani donated 315 crores to his alma mater IIT Bombay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.